कुडाळ : प्रतिवर्षाप्रमाणे डिगस सुर्वेवाडी येथील श्री देवी भवानी मंदिर येथे गुरुवार दि. 1 मे 2025 रोजी श्री भवानी देवीचा वर्धापनदिन जयभवानी उत्कर्ष मंडळ (मुंबई) व जय भवानी प्रासादिक भजन मंडळ, डिगस (सुर्वेवाडी) यांच्या संयुक्त विद्यमाने साजरा करण्यात येणार आहे. तसेच मंगळवार दि. 6 मे 2025 रोजी श्री देवी भवानीचा गोंधळ उत्सव साजरा करण्यात येणार आहे.
वर्धापनदिनानिमित्त गुरूवार 1 मे रोजी सकाळी 9 वा. श्री सत्यनारायण महापूजा, सकाळी 11 वा. श्रींची महाआरती व तिर्थप्रसाद, दुपारी 1 वा. महाप्रसाद, सायं. 7 वा. हरीपाठ व स्थानिक ग्रामस्थांची सुश्राव्य भजने, रात्री 9 वा. श्री सिद्धेश्वर पारंपारीक दशावतार नाट्यमंडळ (कसई-दोडामार्ग) यांचा विजयमणी हा नाटयप्रयोग होणार आहे. तरी सर्वांनी यावेळी उपस्थित राहून कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन सुर्वेवाडी ग्रामस्थांनी केले आहे.
डिगस येथे उद्या भवानी देवी वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रम..
