आर्सेनिक गोळ्यांचे वाटप..

आचरा व्यापारी संघाचा उपक्रम:व्यापाऱ्यांना केले वाटप

मालवण दि प्रतिनिधी कोरोना रोगाविरोधात रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या आयुष मंत्रालयाने मान्यता दिलेल्या आर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप आचरा व्यापारी संघटनेमार्फत आचरा व्यापारी बांधवांना केले जाणार आहे. सदर गोळ्या आचरा येथील श्री दत्त क्लिनिकचे डॉ स्वप्नील भोगटे यांच्या मार्फत आचरा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अर्जुन बापर्डेकर , खजिनदार जयप्रकाश परूळेकर सचिव निखिल ढेकणे यांच्या कडे सुपूर्द करण्यात आले असून लवकरच त्यांचे वाटप व्यापारी बांधवांना करण्यात येणार असल्याचे त्यांच्या कडून सांगण्यात आले आहे. संध्याच्या कोरोना महामारीत ग्राहकांना सेवा देताना व्यापारी बांधवांचा संपर्क थेट ग्राहकांशी येत असतो. या मुळे व्यापारी बांधवांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी आवश्यक असलेल्या आर्सेनिक अल्बम गोळ्या वाटण्याचे ठरविण्यात आले होते. या साठी आचरा येथील श्री दत्त क्लिनिक चे डॉ स्वप्नील भोगटे यांनी सहकार्य देत व्यापारी संघटनेला आर्सेनिक च्या गोळ्या उपलब्ध करून दिल्या त्यांच्या या सहकार्याबद्दल आचरा व्यापारी संघटने तर्फे त्यांना धन्यवाद व्यक्त करण्यात आले आहेत.

You cannot copy content of this page