वैभववाडी बाजारपेठ उद्या पासून चार दिवस बंद राहणार…

*💫वैभववाडी दि.२५-:* वैभववाडी तालुक्यात कोरोना संसर्गाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत.वैभववाडी बाजारपेठेत ग्रामिण भागातील लोक दरदिवशी सकाळच्या वेळी मोठया संख्येने गर्दी करत आहेत.वैभववाडी बाजारपेठेतील गर्दी टाळण्यासाठी येथील व्यापारी मंडळाने दि २७ एप्रिल ते ३० एप्रिल या कालावधीत सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी व प्रशासनाला सहकार्य करण्याच्या उद्देशाने सलग चार दिवस दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय वैभववाडीतील व्यापाऱ्यांनी घेतला आहे.सध्यस्थितीत शासनाने बाजारपेठ सकाळी ७ ते ११ या वेळेत दुकाने उघडण्याची परवनगी दिली आहे.परंतु ग्राहकांची सकाळच्या सत्रात खूपच गर्दी होत असलेचे दिसत आहे. ही गर्दी कमी करण्यासाठी व कोरोना टाळण्यासाठी व्यापाऱ्यांनी दुकाने उत्स्फूर्तपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.सोमवारी सकाळी ७ ते ११ यावेळेत दुकाने सुरु राहणार आहेत.मंगळवार पासून अत्यावश्यक सेवा म्हणून मेडिकल स्टोअर्स सुरू राहणार आहेत.अशी माहिती वैभववाडी तालुका व्यापारी मंडळाचे अध्यक्ष रत्नाकर कदम यांनी दिली आहे.यावेळी माजी अध्यक्ष मनोज सावंत,अरविंद गाड,तेजस आंबेकर,सुरेंद्र नारकर व अन्य व्यापारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page