पाच दिवसीय निशुल्क योग शिबिरास उस्फुर्त प्रतिसाद…!

⚡बांदा ता.१२-: आजगाव शाळा नं.१ येथे पतंजली योगपीठ सिंधुदुर्ग आणि शिवप्रेमी मित्रमंडळ आजगाव-धाकोरे आयोजित पाच दिवसीय निशुल्क योग शिबिरास उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. योग मार्गदर्शक विद्याधर पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिबीर संपन्न झाले.
श्री पाटणकर यांनी या योग शिबिरात आपले शरीर रोगमुक्त होण्यासाठी, रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी, शरीराचे वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी, दैनंदिन जीवनात ताण तणावातून मुक्तता मिळवण्यासाठी, पचनक्रिया सुधारण्यासाठी, मधुमेह उच्च दाब, कॅन्सर, हृदयरोग सारख्या आजारावर मात करण्यासाठी आणि निरोगी जीवन जगण्यासाठी योगासने, प्राणायाम, सूर्यनमस्कार आदी योगासने याविषयी माहिती देत प्रात्यक्षिक करून दाखविले. या शिबिराला आजगाव-धाकोरे परिसरातून ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. श्री पाटणकर हे गावागावात निःशुल्क योगा बाबत मार्गदर्शन, माहिती देतात. नागरिकांचे शरीर रोगमुक्त, तंदुरुस्त ठेवण्यासाठी प्रयत्न करत असतात.
आजगाव येथील योग शिबिर यशस्वी होण्यासाठी शिवप्रेमी मित्र मंडळ, आजगाव-धाकोरे मधील कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली.
फोटो:-
आजगाव येथे योग शिबिरात सहभागी झालेले ग्रामस्थ.

You cannot copy content of this page