गटार बांधकाम कामाचे भूमिपूजन ज्येष्ठ नागरिक रामकृष्ण पेळपकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून संपन्न…!

⚡बांदा ता.१२-: जिल्हा नियोजन निधीतून बांदा शहरातील प्रभाग क्रमांक ४ मध्ये पानवळ येथील धारगळकर सर्व्हिसिंग सेंटर ते काजरोबा देवस्थान गटार बांधकाम कामाचे भूमिपूजन ज्येष्ठ नागरिक रामकृष्ण पेळपकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून संपन्न झाले.
यावेळी सरपंच प्रियांका नाईक, उपसरपंच आबा धारगळकर, भाजपा महिला जिल्हाध्यक्ष सौ. श्वेता कोरगावकर, माजी उपसरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य राजाराम उर्फ बाळु सावंत, जावेद खतीब, सौ. रेश्मा सावंत, सौ. दीपलक्ष्मी सावंत-पटेकर, भाजपा बांदा शहर अध्यक्ष बाबा काणेकर, माजी सरपंच गुरु धारगळकर, नारायण पित्रे, शाम गवस, समीर पेळपकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
याठिकाणी गेली कित्येक वर्षे गटाराची मागणी होती. या प्रभागाचे सदस्य बाळु सावंत यांनी सातत्याने यासाठी पाठपुरावा करून निधीची तरतूद करून घेतली.
फोटो:-
बांदा पानवळ येथे गटार कामाचा शुभारंभ करताना रामकृष्ण पेळपकर. सोबत इतर.

You cannot copy content of this page