⚡देवगड ता.१२-: “देवगड तालुक्यातील मिठबाव येथील श्री देव रामेश्वर मंदिरात हनुमान जन्मोत्सवाने मंदिरातील चैत्र मासातील वार्षिक उत्सवाची सांगता झाली.
“सुमारे तीनशे वर्षांनंतर खंडित असलेल्या या मंदिरातील वार्षिक उत्सव पुन्हा यावर्षी पासून सुरु झाला. होळी पौर्णिमेपासून पौर्णिमेपर्यंत या एक महिन्याच्या कालावधीत हा उत्सव असतो. गुढीपाडव्यानंतर चैत्र मासातील शिव विष्णूचा नवरात्रोत्सव उत्सव रामनवमी पर्यंत असतो. राम नवमीला या नवरात्रोत्सवाची सांगता होते व त्यानंतर येणाऱ्या हनुमान जयंतीला मंदिरात होणाऱ्या वार्षिक उत्सवाची सांगता होते. जवळपास एक महिना चालतो.
आज हनुमान जयंतीच्या कार्यक्रमाची सुरुवात पहाटे पाच वाजता झाली. कोटकामते येथील ह.भ.प. कमलाकर पाटकर यांच्या कीर्तनाने वातावरण भक्तिमय झाले. त्यानंतर हनुमान जन्मोत्सवाचा मुख्य सोहळा सूर्योदयापूर्वी पार पडला.”
“हनुमान जन्मानंतर काढण्यात आलेल्या पालखी मिरवणुकीत ‘जय श्रीराम’, ‘जय हनुमान’ च्या घोषात पालखी मिरवणूक काढण्यात आली. मिठबाव, कातवण, तांबळडेग या तीन गावांतील भाविक सहभागी झाले होते. हनुमान स्तोत्राचे पठण करत, भक्तीमय वातावरणात हा उत्सव साजरा करण्यात आला.”
व्हिडिओ