Headlines

जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर आता सर्व निविदा होणार प्रसिद्ध…

सीईओ खेबुडकर यांची माहिती:
कामातील अनियमितता:रोखण्यासाठी घेतला निर्णय..

ओरोस ता ८
जिल्हा परिषद, पंचायत समित्या किंवा ४३४ ग्राम पंचायती यांच्याकडून मंजूर कामांच्या जाहीर करण्यात येणाऱ्या निविदा जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. या कामांबाबत करण्यात येणारे विविध आदेश सुध्दा या संकेतस्थळावर टाकण्यात येणार असून काम पूर्ण झाल्यावर कामाचा फोटोही प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यामुळे करण्यात आलेल्या कामात अनियमितता असल्यास नागरिकांना समजू शकेल, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ७ जानेवारी पासून सुरू केलेली १०० दिवसांचा कार्यक्रम अंतर्गत जिल्हा परिषदेने राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती देण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी खेबुडकर यांनी आपल्या कॉन्फरन्स रुममध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी ही माहिती दिली. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस, सामान्य प्रशासन उपमुख्य कार्यकारी अधिकारी किशोर काळे आदी उपस्थित होते. यावेळी खेबुडकर यांनी जिल्हा परिषद आणि आठही पंचायत समिती परिसरात स्वच्छ्ता मोहीम आज राबविण्यात आली. त्याला चांगला प्रतिसाद लाभला. यामुळे परिसर स्वच्छ झाला. परिसर प्लास्टिक मुक्त करण्यासाठी आमचा प्रयत्न राहिला, असे सांगितले.

You cannot copy content of this page
04:11