⚡बांदा ता.०८-: ऐन काजू हंगामात वाफोली येथे काजू बागायतीना आग लागल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
वाफोली कालव्याच्या नजीक असलेल्या काजू बागायतीमध्ये
अचानक शॉर्टसर्किट मुळे दुपारी बाराच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीच्या भडक्यामध्ये काजू बागायतीचे बऱ्याच प्रमाणात नुकसान झाले. आग विझविण्याचा प्रयत्न स्थानिकांनी केला, मात्र दुपारची वेळ असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. या आगीत काजू बागायती जळून खाक झाल्यात. पंचनामा झाला नसल्याने नुकसानीचा अधिकृत आकडा समजू शकला नाही.
यामध्ये सुनिता सुधाकर गवस, उमाजी खेमा गवस, भाग्यश्री भगवान सावंत, नलिनी यशवंत गवस, सुरेश गवस यांच्या काजू बागायतीचे नुकसान झाले.
आगीच्या घटनेची माहिती मिळताच गावातील स्थानिक ग्रामस्थांनी तसेच काजू बागायतदारांनी घटनास्थळी धाव घेतली. अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यास यश आले. तरी संबंधित विभागाने पंचनामा करून नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी काजू बागायतदारांकडून करण्यात येत आहे.
फोटो:-
वाफोली येथे काजू बागायती जळून खाक झाली. (छायाचित्र- नीलेश मोरजकर)
वाफोली येथे काजू बागायतीना आग लागल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान…
