कुडाळ येथे १० एप्रिलला राज्यस्तरीय बुद्दीबळ आणि कॅरम स्पर्धा…

खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त क्रीडा महाकुंभ सोहळा:रणजित देसाई यांची पत्रकार परिषदेत माहिती..

कुडाळ : महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, खासदार नारायण राणे यांच्या 10 एप्रिलला होणाऱ्या वाढदिवसाच्या निमित्तान चिपळूण ते दोडामार्ग पर्यंत विविध खेळांचा क्रीडा महाकुंभ सोहळा होणार आहे. त्या अंतर्गत कुडाळ तालुक्यात विविध कला, क्रीडा, सांस्कृतिक आणि समजोपयोगी कार्यक्रमांच आयोजन प्रत्येक जिल्हा परिषद गटात करण्यात आले असून हा वाढदिवस अत्यंत उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. कुडाळ मध्ये पालकमंत्री नितेश राणे कुडाळ मालवणचे लोकप्रिय आमदार निलेश राणे तसेच भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत शिवसेना जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यस्तरीय खुली रॅपिड बु‌द्धिबळ स्पर्धा तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिली वहिली जिल्हास्तरीय सुपर सिक्स चॅलेंजर कॅरम स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. अशी माहिती रणजित देसाई यांनी दिली. कुडाळ इथं ते पत्रकार परिषदेत बोलत होते .
या क्रीडा महाकुंभ सोहळाविषयी रणजित देसाई यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. यावेळी तालुका अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, रुपेश कानडे, सुनील बांदेकर, जयेश चिंचाळकर उपस्थित होते. यावेळी बोलताना रणजित देसाई म्हणाले, राज्यस्तरीय खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत एकूण 300 स्पर्धक सहभागी झाले आहेत. प्रथम पाच विजेत्यांना रोख बक्षिसे व आकर्षक चषक तसेच पहिल्या 50 स्पर्धेकांना रोख रक्कमेची बक्षिसे व मेडल्स देण्यात येणार आहेत. या स्पर्धेत सहभागी सर्व खेळाडूंना आकर्षक टी शर्ट आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहेत. याशिवाय इतर उत्तेजनार्थ बक्षीसामध्ये 7 वर्षे ते 17 वर्ष वयोगटातील मुले व मुलींसाठी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.या स्पर्धेसाठी मुख्य ऑरबिटर म्हणून श्री. संजय कवळेकर (इंटर नॅशनल ऑरबिटर) हे काम पाहतील.सहभागी झालेल्या ३०० खेळाडूंमध्ये सिंधुदुर्गातून ६०, गोवा ४०, रत्नागिरी ३०, तर कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, मुंबई, बेलगाव येथून २० खेळाडू सहभागी झाले आहेत.
स्पर्धेत सर्वात उच्च आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त खेळाडू गोव्याचा मंदार लाड (2149) हा असून तो 18 वर्षाचा आहे, त्या खालोखाल सातारा मधून 50 वर्षाचे उमेश कुलकर्णी (1866), कोल्हापूर मधून संतोष कांबळे (1754), रत्नागिरी मधून सौरीष कशेळकर (1721), सिंधुदुर्ग मधुन अनिरुद्ध तारी, सावंतवाडी (1659) असे उच्च मानांकन प्राप्त खेळाडू जिल्ह्यात प्रथमच होत असलेला खासदार चषक मिळविणेसाठी सहभागी झाले आहेत, स्पर्धेत एकूण 50 पेक्षा जास्त खेळाडू आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त खेळाडू आहेत.
या स्पर्धेत सर्वात वयस्कर खेळाडू सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बळीराम आडेलकर (76 वय) व सर्वात लहान खेळाडू सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाच वर्षाचा सुप्रसाद प्रभूदेसाई सहभागी झाले आहेत. या स्पर्धेचे परीक्षण गोव्यातील आंतरराष्ट्रीय पंच संजय कवळेकर व त्यांची टिम करणार आहे. सदर स्पर्धा नऊ फेरी मधून स्वीसलीग पद्धतीने खेळवली जाणार असून त्याची प्रत्येक फेरी नंतर त्या त्या फेरीचा रिझल्ट आंतरराष्ट्रीय वेबसाईट चेस रिझल्ट वर प्रसारीत केली जाणार आहे
त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्हा डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिली सुपर सिक्स चॅलेंजर कॅरम स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले आहे. कॅरम स्पर्धेत एकूण 100 पेक्षा जास्त खेळाडू सहभागी होतील. या स्पर्धेतील पहिल्या चार क्रमांकासाठी रोख रक्कम व चषक तसेच इतर अनेक उत्तेजनार्थ बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. सिंधुदुर्ग व गोवा येथील नामवंत पंच स्पर्धेसाठी उपलब्ध असतील. स्पर्धेचे मॉनिटरिंग डिस्ट्रिक्ट असोसिएशचे श्री. योगेश फणसळकर करतील.
बु‌द्धिबळ व कॅरम या दोन्ही स्पर्धा वासुदेवानंद संकुल, उद्यम नगर कुडाळ, हॉल नंबर 1 व 2, येथे दिनांक 10 एप्रिल रोजी सकाळी 8.00 ते सायं. 5.50 वा. पर्यंत संपन्न होतील. स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या खेळाडूंनी बु‌द्धिबळ स्पर्धेसाठी श्रीकृष्ण आडेलकर, मो. न. 9422381949 तर कॅरम स्पर्धेसाठी श्री. योगेश फणसळकर मो. नं. 7620755766 यांच्याशी संपर्क करावा. दिनांक 10 एप्रिलला होणाऱ्या या क्रीडा महाकुंभसाठी स्पर्धक खेळाडू व क्रीडारसिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन श्री. संजय वेंगुर्लेकर आणि रुपेश कानडे यांनी आयोजकांच्या वतीने केले आहे.
या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा आणि खासदार नारायण राणे यांचा वाढदिवस सोहळा १० एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता ओरोस येथील शरद कृषी भवन येहते होणार आहे. त्यालास सुद्धा सरावाने उपस्थित राहावे असे आवाहन रणजित देसाई यांनी केले आहे.

You cannot copy content of this page