कुडाळच्या ६८ ग्रा.प.साठी सरपंचपद आरक्षण जाहीर…

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींची सन २०२५-२०२३ या कालावधीसाठी सरपंच पदाचा आरक्षण सोडत कार्यक्रम मंगळवारी येथील सिद्धिविनायक हॉलच्या सभागृहात पार पडला. यावेळी तहसीलदार वीरसिंग वसावे, नायब तहसीलदार संजय गवस व अमरसिंह जाधव, निवडणूक नायब तहसीलदार श्री.पिळणकर, पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम आदी उपस्थित होते.
अनुसूचित जातीसाठी आरक्षित सरपंच पदे – प्रवर्ग २ व महिला ३, अनुसूचित जमातीसाठी आरक्षित सरपंच पदे – प्रवर्ग १ व महिला ०, नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित सरपंच पदे – प्रवर्ग ९ व महिला ९ आणि खुला प्रवर्ग – प्रवर्ग २२ व महिला २२ अशा एकूण ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. आद्यश्री वेंगुर्लेकर (इयत्ता पहिली) व रणवीर गावडे या शालेय मुलांच्या हस्ते सरपंच पदाची सोडत चिठ्ठ्या काढून काढण्यात आली.
अनुसूचित जाती (महिला) – आंबडपाल, वाडीवरवडे व रानबांबुळी तर जनरल (प्रवर्ग)साठी बांबुळी आणि निरूखे सरपंच पदासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. अनुसूचित जमाती (प्रवर्ग) – आंब्रड, महिला – 0.
नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) – कसाल, साळगाव, पावशी, पिंगुळी, निवजे, माड्याचीवाडी, माणगांव, आवळेगाव ओरोस खुर्द व पुळास. नागरिकांचा मागास प्रवर्ग (जनरल – पुरूष/स्त्री) – हुमरमळा वालावल, तुळसुली क.नारूर, शिवापूर, नानेली, मांडकुली, गोठोस, गोवेरी, नारूर क.नारूर, हुमरमळा अणाव.
खुला प्रवर्ग (सर्वसाधारण महिला) – हुमरस, कडावल, कुंदे, कडावल, पांग्रड, तुळसुली तर्फ माणगांव, पडवे, मुळदे, नेरूर देऊळवाडा, गिरगाव-कुसगाव, जांभवडे, आंदुर्ले, पोखरण-कुसबे, कुपवडे, सरंबळ, ओरोस बुद्रुक, वर्दे, भडगाव बुद्रुक, तेर्सेबांबर्डे, अणाव, आकेरी, चेंदवण व वालावल.
खुला प्रवर्ग (सर्वसाधारण – पुरूष/स्त्री) – भरणी, वसोली, बांव, पणदूर, तेंडोली, गावराई, झाराप, घोडगे, कवठी, सोनवडे तर्फ हवेली, डिगस, परबवाडा पाट, केरवडे कर्याद नारूर, हिर्लोक, वेताळबांबर्डे, घावनळे, नेरूर कर्याद नारूर, सोनवडे तर्फ कळसुली, बिबवणे, कालेली, वाडोस व केरवडे तर्फ माणगांव.

You cannot copy content of this page