शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या दणक्या नंतर मालवण बस स्थानक येथील जुन्या जीर्ण झालेल्या इमारत बांधकाम पाडण्याच्या कामाला सुरुवात…

⚡मालवण ता.०८-:
मालवण बस स्थानक येथील काही दिवसापूर्वी जुन्या इमारतीचा काही भाग कोसळून एक महिला प्रवासी गंभीर जखमी झाल्यानंतर या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर आणि पदाधिकाऱ्यानी आगार व्यवस्थापक यांना धारेवर धरीत जीर्ण झालेली इमारत जर दोन दिवसांत पाडली नसेल तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या स्टाईलने जुनी इमारत पाडण्यात येईल असा इशारा दिल्यानंतर याबाबतची दखल घेत जुन्या इमारत पाडण्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात देखील करण्यात आली आहे.

काही दिवसापूर्वी मालवण बसस्थानकावरील जुन्या इमारतीच्या स्लॅबचा काही भाग कोसळून एक महिला प्रवासी गंभीर जखमी झाल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर आणि पदाधिकाऱ्यानी आगार व्यवस्थापक यांना धारेवर धरीत आगार व्यवस्थापक यांना अजून किती प्रवासी जखमी होत राहणार आहेत? किती प्रवासी यांचे प्राण जाण्याची वाट बघत आहात? असा जाब विचारण्यात आला होता. तसेच जीर्ण झालेली इमारत जर दोन दिवसांत पाडली नसेल तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या स्टाईलने जुनी इमारत पाडण्यात येईल असा इशारा दिला होता शेवटी याबाबतची दखल घेत जुन्या इमारत पाडण्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात
करण्यात आली आहे

You cannot copy content of this page