अंमली पदार्थ विक्रेत्यांना त्वरित अटक करा !

सजग नागरिक मंचचे पोलिसाना निवेदन..

कुडाळ : कुडाळ शहरात अमली पदार्थ विक्रेत्यांनी आपले हातपाय पसरले आहेत या सगळ्याकडे पोलिसांनी आपले लक्ष देणे गरजेचे आहे. आम्हाला तरुण पिढी वाचवायची आहे त्यासाठी सनदशीर मार्गाने आम्ही प्रयत्नशील राहणार आहोतच, परंतु पोलिस खात्याने अंमली पदार्थ विक्रेत्यांना त्वरित अटक करून आपली बांधिलकी जपावी, अशी मागणी सजग नागरिक मंचाच्या वतीने करण्यात आली आहे. तशा आशयाचे निवदेन मंचाच्या वतीने आज कुडाळ पोलिसांना देण्यात आले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आणि प्रामुख्याने कुडाळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांचा मोठा खप आहे असे दिसून येते. अंमली पदार्थ विक्रीत करणारी माणसे ही जिल्ह्यातील व जिल्हा बाहेरील माणसे आहेत; परंतु त्यांच्यावर पोलीस खात्याचा काहीही वचक नाही असे दिसते. त्यामुळे तरुण मुले या विळख्यात सापडत आहेत. सदरील बाब ही खूप गंभीर स्वरूपाची आहे. आणि त्यामुळे शालेय मुलांवर या सगळ्या गोष्टींचा विपरीत परिणाम होत आहे.
तरुण पिढी प्रामुख्याने अंमली विळख्यात अडकली तर त्याचा परिणाम संपूर्ण देशावर होणार आहे, आणि म्हणून या अंमली पदार्थांच्या विरोधात खबरदारीचे पाऊल उचलणे क्रमप्राप्त आहे.
दोन दिवसांपूर्वी रुपये २५ लाख एवढ्या रकमेचा अंमली पदार्थ कुडाळ येथून गोवा राज्यात गेला आणि तो सरहद्दीवर गोवा पोलिसांनी पकडला ही बातमी प्रसिद्ध झाली आहे. अंमली पदार्थ ताब्यात बाळगणारा इसम हा कुडाळ येथील राहणारा आहे. म्हणूनच कुडाळ शहरात अमली पदार्थ विक्रेत्यांनी आपले हातपाय पसरले आहेत या सगळ्याकडे पोलिसांनी आपले लक्ष देणे गरजेचे आहे शाळा कॉलेजच्या जवळील दुकाने, उघड्या मोडक्या इमारती या सगळ्या बार्बीकडे पोलीस खात्याने बारकाईने लक्ष दिले पाहिजे. कारण हे अंमली पदार्थाचे अड्डे आहेत, आम्हाला तरुण पिढी वाचवायची आहे त्यासाठी सनदशीर मार्गाने आम्ही प्रयत्नशील राहणार आहोतच, परंतु पोलिस खात्याने अंमली पदार्थ विक्रेत्यांना त्वरित अटक करून आपली बांधिलकी जपावी असे वाटते.असे या निवेदनात म्हटले आहे.
यावेळी ऍड. राजीव बिले, प्रा. अजित कानशिडे, रमाकांत नाईक, बाळा राणे, ऍड. हेमांगी वराडकर, तेजस सावंत, ऍड. दत्ताराम बिले, अवधूत परब, सौ. सुप्रिया मेहता, बबन घुर्ये, ऍड. अंजली मुतालिक, बाबल पावसकर, हरिश्चंद्र वेंगुर्लेकर, संजय भोगटे, प्रसाद शिरसाट, मनीष पावसकर, भूषण कदम आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page