४ सुवर्ण पदक, ८ रौप्य पदक व ६ कांस्य पदकांसह १८ विद्यार्थी पदकाचे मानकरी..
सावंतवाडी : मळगाव येथील शारदा विद्यालय मळगाव रस्ता या जिल्हा परिषद शाळेने नुकत्याच झालेल्या सिंधुदुर्ग टॅलेंट सर्च परीक्षेत नेत्रदीपक यश प्राप्त केले आहे. या परीक्षेत शाळेने एकूण ४ सुवर्ण पदक, ८ रौप्य पदक व ६ कांस्य पदकांची कमाई केली असून एकूण १८ विद्यार्थी पदकाचे मानकरी ठरले आहेत.
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम टॅलेंट सर्च, भारत टॅलेंट सर्च, ब्रेन डेव्हलपमेंट, यशवंत शिष्यवृत्ती परीक्षेत मिळविलेल्या उज्ज्वल यशा पाठोपाठ सिंधुदुर्ग टॅलेंट सर्च परीक्षेतही शाळेच्या मुलांनी नेत्रदीपक यश प्राप्त केले आहे. परीक्षेला प्रविष्ट एकूण २७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यात एकूण १८ विद्यार्थी पदकाचे मानकरी ठरले आहेत
शाळेचा निकाल पुढीलप्रमाणे- इयत्ता चौथी-तेज दत्ताराम मळगावकर-१६० गुण-सुवर्ण पदक, गायत्री डोंगरे-१३६ गुण-रौप्य पदक, ममता आसयेकर-१३२ गुण-रौप्य पदक, लावण्या अजित नाईक-१२८ गुण-कांस्य पदक, आर्या गजानन सामंत-११२ गुण-कांस्य पदक कमविले. तसेच देवेश राजन राऊळ-१०६ गुण, समिक्षा सहदेव राऊळ- १०० गुण, रुद्रप्रसाद विनायक राणे-१०० गुण, किर्ती राजन राऊळ-९२ गुण, युगा सिद्धेश तेंडोलकर-९२ गुण, आर्य अजित कानसे-९० गुण, हर्षद बापू निर्गुण-७६ गुण प्राप्त करत उत्तीर्ण झाले आहेत. इयत्ता तिसरी निकाल-काव्या अर्जुन राऊळ-१४२ गुण-रौप्य पदक, वेद लतेश पावसकर-१३० गुण – कांस्य पदक, रुची सच्चिदानंद मेस्त्री- १२२ गुण – कांस्य पदक, मानसी लक्ष्मण म्हाडेश्वर- ११८ गुण- कांस्य पदक, भिमसेन शंकर गावकर – ९२ गुण-उत्तीर्ण, इयत्ता दुसरी निकाल- गौरांग पंढरीनाथ गावकर-१७२ गुण-सुवर्ण पदक, आलिया अमर राऊळ-१५४ गुण-सुवर्ण पदक, आशुतोष शिवराम तारळकर-१५२ गुण-सुवर्ण पदक, माही सत्यप्रकाश हरमलकर- १४८ गुण-रौप्य पदक, श्लोक गजानन राऊळ-१४६ गुण-रौप्य पदक, चार्वी रघुनाथ वारंग-१४२ गुण-रौप्य पदक, ज्योती धर्मेन्द्र राजपूत-१४० गुण-रौप्य पदक, ओवी गजेन्द्र गावडे-१३६ गुण-रौप्य पदक, दुर्वा महेश पवार-११४ गुण-कांस्य पदक, रक्षंदा विशाल जाधव-१०६ गुण -उत्तीर्ण होत यश मिळविले. या यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सिद्धेश तेंडोलकर, माजी अध्यक्ष विवेक नार्वेकर, शाळेच्या मुख्याध्यापिका अनुराधा सुर्वे, शिक्षिका अस्मिता गोवेकर, वर्षा गवस, सीमा सावंत, सरीता पाटील तसेच शाळा व्यवस्थापन समिती, पालक शिक्षक संघ, माता पालक संघ, माजी विद्यार्थी यांच्यावतीने अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
