मीठमुंबरी येथील दुर्दैवी घटना
*💫देवगड दि.२४-:* तालुक्यातील मिठमुबरी मधलीवाडी प्राथमिक शाळे जवळ घाटी रस्त्यावर रोलर खाली चिरडून एका कामगाराचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात आज सकाळी ९:३० वाजण्याच्या सुमारास घडला आहे. राजू चव्हाण (वय ३५, रा. विजापूर, गुलबर्गा) असे त्या कामगारांचे नाव आहे. या अपघाताची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय कातिवले व पोलिस कर्मचारी घटना स्थळी दाखल झाले आहेत.
