⚡कणकवली ता.३१-: हरकुळ बुद्रुक येथे प्रतिवर्षीप्रमाणे ओमकार मित्रमंडळ टेंबवाडी यांच्यावतीने मंगळवारी १ एप्रिल २०२५ रोजी श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. सत्यनारायण महापूजेनिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले आहे.
सकाळी ठीक ११ वा. श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी ३ वा. हरिपाठ, सायं ५ ते ८ सुस्वर भजने व रात्रौ ठीक १० वा. नितीन आशयेकर प्रस्तुत श्री देवी भुमिका दशावतार नाट्य मंडळ यांचा महान पौराणिक दशावतारी नाट्यप्रयोग सादर होणार आहे.
तरी सर्व भाविकांनी तीर्थ प्रसादाचा व रात्री होणाऱ्या दशावतारी नाट्यप्रयोगाचा लाभ घ्यावा असे आव्हान मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
