वेंगुर्ला प्रतिनिधी – ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षा १२ जानेवारी २०२५ रोजी पार पडली. यामध्ये वेंगुर्ला येथील सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूलचे दोन विद्यार्थी तालुक्यात प्रथम आले आहेत. यामध्ये इयत्ता पहिलीमधील कु.तनिषा सातार्डेकर ही ९० गुण मिळवित इंग्रजी माध्यमातून तालुक्यात प्रथम व संपूर्ण देशात ८७वा क्रमांक प्राप्त केला आहे. तसेच कु.श्रेयांश सावंत हा ९३ गुण मिळवून तालुक्यात इंग्रजी माध्यमातून इयत्ता तिसरीतून प्रथम आला आहे व संपूर्ण देशात त्याने ५५ वा क्रमांक प्राप्त केला आहे.
त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे उपाध्यक्ष इर्शाद शेख, संचालक प्रशांत नेरुरकर, सचिव दत्तात्रय परुळेकर, मुख्याध्यापिका मनीषा डिसोजा, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.
फोटोओळी – तनिषा व श्रेयांश यांचे स्कूलतर्फे अभिनंदन करण्यात आले.
ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षेत सिंधुदुर्ग विद्यानिकेतनचे सुयश…
