५०० लस दोन दिवसांत संपल्या:आचरा येथून आणले ४० डोस
*💫मालवण दि २४-:* मालवणात कोरोना प्रतिबंधक लस संपल्यानंतर पुन्हा लसीचे डोस प्राप्त झाल्यावर काल मालवण ग्रामीण रुग्णालयात पुन्हा लसीकरण सुरू झाल्यावर रुग्णालयाला प्राप्त ५०० लसींचा साठा दोन दिवसातच संपला आहे. लास घेण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात काल व आज नागरिकांनी गर्दी केल्याने आचरा प्राथमिक केंद्रातून लसीचे ४० अधिक डोस मागविण्यात आले. मालवण तालुक्यात कोव्हीशिल्ड लसीचे १५०० डोस दोन दिवसांपूर्वी प्राप्त झाले होते. यात मालवण ग्रामीण रुग्णालयाला ५०० डोस देण्यात आले होते. रुग्णालयात काल पासून लसीकरण पुन्हा सुरू झाल्यावर काल व आज नागरिकांनी लास घेण्यासाठी गर्दी केल्याने हा साठा दोन दिवसातच संपला. या नागरिकांमध्ये पहिला डोस तसेच दुसरा डोस घेणाऱ्या नागरिकांचा समावेश होता. साठा संपल्याने प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांना लस देण्यासाठी आचरा प्राथमिक आरोग्य केंद्राकडून ४० लस मागविण्यात आल्या. पुन्हा लसचा साठा उपलब्ध झाल्यावर लसीकरण मोहीम पुन्हा सुरू करण्यात येईल, असे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी पाटील यांनी दिली.
