⚡देवगड ता.२२-: जागतिक जलदिना निमित्त पाणी गुणवत्तेत चांगली कामगिरी केल्याबद्दल कुणकेश्वर जलसुरक्षक ऋषिकेश चव्हाण याचे पाणी गुणवत्ता तज्ञ हर्षदा बोथीकर यांनी प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला .
पाणी शुद्धीकरण करणे व पाणी गुणवत्ता चांगली राखण्याची महत्वाची जबाबदारी जलसुरक्षक गावामध्ये पार पाडत असतो . याच अनुषंगाने जागतिक जल दिनानिमित्त दरवर्षी पाणी गुणवत्तेत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या जलसुरक्षक यांचा सत्कार पंचायत समिती देवगड अंतर्गत करण्यात येतो . यंदाचा उत्कृष्ट जलसुरक्षक म्हणून कुणकेश्वर मध्ये जलसुरक्षकाचे काम करणारा ऋषिकेश सुरेश चव्हाण याची निवड करण्यात आली आहे . कुणकेश्वर गावात गेली सहा वर्षाहुन अधिक वर्षे ऋषिकेश काम करत असुन पर्यटन दृष्टया महत्त्वाच या कुणकेश्वर गावात नेहमीच पर्यटकांची वर्दळ असते .पर्यटकांना व स्थानिक नागरीकांना शुद्ध पाणी पुरवठा होण्यासाठी ग्रामपंचायतीमार्फत नळाद्वारे व सार्व. विहीरीचे पाणी शुद्धीकरणांची महत्वाची जबाबदारी ऋषिकेशची असुन ती तो योग्य प्रकारे जबाबदारी पार पाडत असुन श्री . क्षेत्र कुणकेश्वर यात्रौत्सवातही पाणी शुद्धीकरण करणे , ओटी टेस्ट घेणे यासारखी महत्त्वाची व जबाबदारीची कामे आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत करत असतो . या विशेष कामगिरीची दखल घेत त्यांचा सत्कार करण्यात आला.
या सत्कार प्रसंगी डाटा ऑपरेटर मोहीनी खडपकर , कनिष्ठ अभियंता पाणी व स्वच्छता विभाग प्रज्ञा पोवार व मान्यवर उपस्थित होते.
