करुळ येथे आज रात्री भव्य रोंबाट व राधानृत्य कार्यक्रम…

विविध लक्षवेधी चित्ररथ ठरणार आकर्षण:कुडाळ नेरूर येथील ६० कलाकार होणार सहभागी..

वैभववाडी प्रतिनिधी
करूळ येथे शिमगोत्सवानिमित्त आज रात्री १० वाजता भव्य रोंबाट व राधानृत्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात दाखल होणारे विविध चित्ररथ हे शिमगात्सवाचे आकर्षण ठरणार आहेत.
कोकणात अनेक सणांत शिमगोत्सव हा सण महत्वाचा आहे. हा सण प्रत्येक गावागावात मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. संपूर्ण कोकणात रोंबाट व राधानृत्य प्रसिद्ध आहे. कुडाळ नेरूर येथील रोंबाट व राधानृत्य कार्यक्रम आज करूळ मधील मांडावर दिमाखात संपन्न होणार आहे. जवळपास ६० कलाकार यात सहभागी होणार आहेत. तरी या कार्यक्रमाला तालुक्यातील व गावातील मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहावे. असे आवाहन वतनदार मंडळी व ग्रामस्थ करूळ यांच्यावतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page