इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेत पहिल्या गटात टोपीवाला हायस्कूल मालवणचा सोहम गवाणकर प्रथम…

⚡मालवण ता.२०-:
मालवण येथील बॅ नाथ पै सेवांगण संचालित साने गुरुजी वाचन मंदिर यांच्या वतीने प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेत पहिल्या गटात टोपीवाला हायस्कूल मालवणचा सोहम गवाणकर याने तर दुसऱ्या गटात मालवणच्या जय गणेश इंग्लिश मिडियमच्या तृष्णा गांवकर हिने प्रथम क्रमांक पटकाविला

बॅ नाथ पै सेवांगण संचालित साने गुरुजी वाचन मंदिर यांच्या वतीने इंग्लिश वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेच्या दादा शिखरे सभागृहात मान्यवरांच्या हस्ते पूज्य साने गुरुजी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून तसेच” खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे” या प्रार्थनेने कार्यक्रमाला सुरुवात झाली. साने गुरुजी वाचन मंदिरचे अध्यक्ष शैलेश खांडाळेकर यांनी स्पर्धेचे स्वरूप समजावून सांगितले. इयत्ता ५ वी ते ७ वी आणि इयत्ता ८ वी ते १० वी या दोन गटांत ही स्पर्धा घेण्यात आली. त्याचा निकाल पुढील प्रमाणे

विभाग पहिला निकाल

प्रथम :सोहम गवाणकर (टोपीवाला हायस्कूल), द्वितीय -अस्मी आठलेकर (टोपीवाला हायस्कूल), तृतीय : मनस्वी कवठकर (जय गणेश इंग्लिश स्कूल) उत्तेजनार्थ प्रथम : आदित्य प्रभू गांवकर (टोपीवाला हायस्कूल) उत्तेजनार्थ द्वितीय : प्रसन्न सामंत (टोपीवाला हायस्कूल)

विभाग दुसरा निकाल
प्रथम : तृष्णा गांवकर (जय गणेश इंग्लिश स्कूल), द्वितीय : फाल्गुनी हिंदळेकर (टोपीवाला हायस्कूल), तृतीय : वेदिका तळवडेकर (टोपीवाला हायस्कूल) उत्तेजनार्थ प्रथम : आर्या दिघे (जय गणेश इंग्लिश स्कूल), उत्तेजनार्थ द्वितीय : साक्षी रावराणे (टोपीवाला हायस्कूल) यांना सन्मानित करण्यात आले.

यावेळी सुंदर हस्ताक्षर स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. प्रथम क्रमांक: प्रांजली कुंभार (ओझर विद्यामंदिर), द्वितीय अनन्या पाटकर (टोपीवाला हायस्कूल), तृतीय : दुर्वा पराडकर (टोपीवाला हायस्कूल) उत्तेजनार्थ प्रथम : मधुरा वस्त (टोपीवाला हायस्कूल), उत्तेजनार्थ द्वितीय : तन्मय परब (भंडारी हायस्कूल) या सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके आणि प्रमाणपत्रे देण्यात आली.

या इंग्लिश वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षण विजय जोशी, राजन हरमलकर, अभय शेट्ये, शैलेश खांडाळेकर यांनी केले. तर सुंदर हस्ताक्षर स्पर्धेचे परीक्षण मनाली वेंगुर्लेकर यांनी केले.

पारितोषिक वितरण प्रसंगी व्यासपीठावर बॅ. नाथ पै सेवांगणचे कार्यवाह लक्ष्मीकांत खोबरेकर उपस्थित होते. त्यांनी सेवांगण मार्फत विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणा-या विविध उपक्रमांची माहिती दिली.

You cannot copy content of this page