कट्टा बाजारपेठ येथून युवती बेपत्ता….!

*💫मालवण दि.२८-:* मालवण तालुक्यातील कट्टा बाजारपेठ येथील वैभवी संदीप गुराम (वय २०) ही युवती बेपत्ता झाली आहे. याबाबत युवतीचा भाऊ करण गुराम यांने कट्टा पोलीस ठाण्यात बहीण बेपत्ता झाल्याची तक्रार दिली आहे. करण गुराम याने दिलेल्या तक्रारीनुसार, कट्टा बाजारपेठ येथे राहणाऱ्या गुराम कुटुंबियांमध्ये वैभवी ही आई, वडील व भावा सोबत राहते. वैभवी कट्टा कॉलेज येथे टीवायबीकॉम मध्ये शिकत होती. तर टायपिंग क्लासलाही जात असे. २४ नोव्हेंबर ला सकाळी साडेदहा वाजता टायपिंग क्लासला जाते असे सांगून गेलेली वैभवी परत घरी आलीच नाही. तिचा मोबाईलही बंद येत होता. सर्वत्र शोध घेऊनही तिचा पत्ता लागू शकला नाही. याप्रकरणी पोलीस हवालदार रुक्मांगत मुंडे, पोलीस नाईक सराफदार, पोलीस कॉन्स्टेबल पुटवाड हे अधिक तपास करत आहेत.

You cannot copy content of this page