सर्जेकोट किल्ल्याने घेतला मोकळा श्वास

किल्ल्याभोवती वाढलेला चारा झाडीझुडपे तोडून किल्ला परिसर स्वच्छ;सह्याद्री प्रतिष्ठान सिंधुदुर्ग विभागातर्फे राबविण्यात आली स्वच्छता मोहिम

*💫सावंतवाडी दि.२८सहदेव राऊळ-:* सह्याद्री प्रतिष्ठान सिंधुदुर्ग विभागातर्फे मालवण तालुक्यातील सर्जेकोट स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. यावेळी किल्ल्याभोवती वाढलेला चारा झाडीझुडपे तोडून किल्ला व परिसर स्वच्छ करण्यात आला. यामुळे सर्जेकोट किल्ल्याने पुन्हा एकदा मोकळा श्वास घेतला आहे. या स्वच्छता मोहिमेत सह्याद्री प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला होता. सह्याद्री प्रतिष्ठान ही संस्था महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांवर दुर्ग संवर्धनाचे कार्य संस्थेचे संस्थापक श्री श्रमिक गोजमगुंडे यांच्या मार्गदर्शनाने करत आहे. संस्थेमार्फत आजवर एक हजारहून अधिक दुर्ग संवर्धन मोहिमा राबविण्यात आल्या आहेत तर १८०० हून अधिक देशातील दुर्गदर्शन मोहिमांचे आयोजन करण्यात आले आहे. दुर्गसंवर्धन मोहिमा या राज्य पुरातत्व विभाग, केंद्र पुरातत्व विभाग आणि वनविभाग यांच्या परवानगीने संयुक्त विद्यमानाने आयोजित केल्या जातात. १० किल्ल्यांवर ११ सागवानी प्रवेशद्वार तर जमिनीवर पडलेल्या २८ तोफांना तोफगाडे संस्थेमार्फत लोकवर्गणीतून बसविण्यात आले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गडकिल्ले आणि ऐतिहासिक स्मारकांच्या जतन आणि संवर्धन या करिता ही संस्था कायम प्रयत्नशील असते. मालवण तालुक्यातीलसर्जेकोट किल्ल्यावर मोठ्या प्रमाणत झाडीझुडपे तसेच चारा वाढली होता. त्यामुळे किल्ल्यातील दुर्ग अवशेष शोधणे कठीण जात होते. सह्याद्री प्रतिष्ठान सिंधुदुर्ग विभागाने स्थानिक ग्रामपंचायत यांच्या मदतीने विनीत मसदेकर नेतृत्वाखाली सह्याद्रीच्या दुर्गसेवकांनी सलग सहा दिवस स्वच्छता मोहिमा राबवून पूर्ण किल्ल्यातील चारा झाडीझुडपे काढून किल्ल्याच्या तटबंदी बुरजासह इतर दुर्ग अवशेष स्वच्छ करून किल्ल्याला मोकळा श्वास दिला. यामुळे आज पर्यटक सर्जेकोट व्यवस्थित पाहू शकतात. ही स्वच्छता मोहिम मीरा बांदा ग्रामपंचायत सरपंच नीलिमा परुळेकर यांच्या मार्गशनाने सह्याद्रीचे दुर्गसेवक विनीत मसदेकर, विवेक गावडे, मनीष गावडे, पंकज जामसंडेकर, भास्कर मसदेकर, विल्सन फर्नांडीस, अनिकेत चव्हाण, दिनेश आंगणे, प्रकाश गावडे, सर्वेश चव्हाण आणि गौरेश गावडे यांनी सहा दिवसांमध्ये सर्जेकोट स्वच्छता मोहिम राबविली, अशी माहिती श्री प्रकाश सावंत व सुनिल राऊळ यांनी दिली. या स्वच्छता मोहिमेचे पर्यटक व ग्रामस्थांनी कौतुक आहे.

You cannot copy content of this page