*💫सावंतवाडी दि.२८-:* कुडाळ येथील संविता आश्रमाला कपडे व इतर साहित्य देण्यासाठी युवा सिंधू फाउंडेशन च्या माध्यमातून केलेल्या आव्हानाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून दात्याकडून कडून आलेले कपडे व इतर वस्तु आज आश्रमाला सुपूर्त करण्यात आलेत. कुडाळ तालुक्यातील अणाव येथील सविता आश्रमात कोरोना रुग्ण आढळल्याने त्यावेळी आश्रमातील सर्व कपडे बेडशीट व इतर आवश्यक साहित्य जाऊन टाकण्याचा निर्णय तेथील व्यवस्थापकांनी घेतला होता त्यामुळे आश्रमातील निराधारांना कपड्याचा प्रश्न निर्माण झाला होता यासाठी सावंतवाडी तालुक्यातील युवा सिंधू फाउंडेशन च्या माध्यमातून दात्यांना आवाहन करताना अंगावरील कपडे पॅन्ट लुंगी शर्ट साड्या स्वेटर चादर बेडशीट आधी जुने नवे साहित्य मागविले होते. या आवाहनाला प्रतिसाद देतांना अनेकदा दात्यांनी मदतीचा हात पुढे करताना कपडे इतर साहित्य फाऊंडेशन’च्या पदाधिकाऱ्यांकडे जमा केले होते जिल्हाभरातून हे साहित्य जमा झाले होते आज फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांकडून अणाव येथे जात आश्रमाच्या पदाधिकाऱ्यांकडे हे साहित्य सुपूर्त केले यावेळी फाऊंडेशनचे सागर नाणोसकर योगेश नाईक गुणाजी गावडे आधी पदाधिकारी उपस्थित होते.
युवासिंधू फाऊंडेशनच्या माध्यमातून सविता आश्रमाच्या मदतीच्या आव्हानाला दात्यांचा उस्फुर्त प्रतिसाद
