आंबोली बाजारवाडी येथे उभे असलेल्या आई व मुलाला बलेनो गाडीने ठोकरल्याने गंभीर जखमी…

आंबोली,ता.१९: येथील बाजारवाडी येथील चैतन्य हॉटेल समोर उभी असलेली साखरी जाणू कोकरे वय (७२) आणि बमु जाणू कोकरे (वय ३३)चूरनीची मुस,चौकुळ येथील आई व मुलाला चार चाकी गाडीने ठोकरले. यात साखरी कोकरे यांचा पाय मोडला आहे दुसऱ्या पायाला चिर गेला आहे. तर बमु कोकरे याचा कोकरे याच्या हाताला डोक्याला जखम झाली असून मुक्का मार लागला आहे. अपघातात गाडीने नाम फलक ला ठोकरून बाजूला उभे असलेल्या दोघांना उडवून गाडी साई पावसकर यांच्या दुकानात थोडी घुसली. गाडी वेगात होती.अपघातानंतर दोघांना आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.याठिकाणी तातडीने डॉक्टर महेश जाधव,डॉक्टर आदिती पाटकर यांनी उपचार केले. आरोग्य सहायिका के.एस.पुराणिक, परिचारिका सीमा शेर्लेकर यांनी सहाय्य केले. आरोग्य केंद्रात सुनील नार्वेकर,दिलीप सावंत,पंढरी कर्पे, उपसरपंच दत्तू नार्वेकर, सचिन नार्वेकर,महेश नार्वेकर आदिनी आरोग्य केंद्रात दाखल केले. या ठिकाणी डॉक्टरांनी उपचार केल्यानंतर अधिक उपचारासाठी सावंतवाडी येथे १०८ ने नेण्यात आले. आंबोली पोलिसांनी आरोग्य केंद्रात भेट दिली.हवालदार दीपक शिंदे यांनी सचिन दत्तात्रय कांबळे वय ३५, राहणार राबावि,१९.पंढरपूर. आकाश विठ्ठल राऊत, वय ३३, इंदिरा गांधी चौक,पंढरपूर यांना पोलिसांनी चौकशीसाठी पोलीस स्टेशन मध्ये घेतले आहे. तर दोघे जन पळून गेले आहेत.बलेनो गाडीने ते पंढरपूर वरून गोव्याच्या दिशेने वेगाने जाताना आंबोली बाजार वाडी येथे अपघात घडला.

You cannot copy content of this page