कामगारांच्या विविध मागण्यासाठी भारतीय मजदूर संघाचे प्रशासनाला निवेदन…

सिंधुदुर्गनगरी ता १८
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांधकाम कामगार व घरेलू कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी व त्यांची पूर्तता होण्याच्या दृष्टीने आज भारतीय मजदूत संघ सिंधुदुर्ग यांच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले.

घरेलू व बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत तत्कालीन सरकारी कामगार अधिकारी यांच्यासोबत डिसेंबर २०२४ मध्ये बैठक होऊन त्यामध्ये चर्चा करण्यात आली होती. या बैठकीत प्रलंबित प्रश्न सोडविण्याचे आश्वासन देऊनही अद्यापही सर्वच प्रश्न प्रलंबित आहेत.
नोंदीत बांधकाम कामगारांना ठेकेदार एजन्सी मार्फत देण्यात आलेल्या प्रशिक्षणाचा ४२०० एवढा प्रशिक्षण भत्ता अद्याप पर्यंत अनेक कामगारांना मिळालेला नाही.
कोरोना महामारी आर्थिक मदतीबाबत सरकारी कामगार अधिकारी यांनी केलेल्या कार्यवाहीची अद्याप पर्यंत संघटनेस माहिती मिळालेली नाही. तसेच कामगारांना न्याय मिळालेला नाही. अवजारे खरेदी करण्याकरिता ५ हजार रुपये अनुदानाचा लाभ देण्याबाबतची कार्यवाही अद्याप झालेली नाही. घरेलू कामगारांना नोंदणी नंतर मिळणाऱ्या लाभाबाबतची कागदपत्रे संघटनेस मिळावी अशी मागणी करूनही आजपर्यंत माहिती मिळालेली नाही तसेच संसार उपयोगी भांडी संच वाटपाबाबत माहिती संघटनेस देण्यात आलेली नाही.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अद्याप पर्यंत भांडी संच वाटप झालेले नाही. अशाप्रकारे प्रलंबित राहिलेले लाभ तात्काळ घरेलू व बांधकाम कामगारांना देण्यात यावे तसेच बोगस संघटना व एजंट यांच्यावर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी भारतीय मजूर संघ सिंधुदुर्ग च्या वतीने अध्यक्ष सत्यविजय जाधव यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. याबाबतचे निवेदन आज त्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांच्याकडे सादर केले. यावेळी ओमकार गुरव, हेमंतकुमार परब ,आदी पदाधिकाऱ्यांसह बांधकाम कामगार उपस्थित होते.

You cannot copy content of this page