सांगुळवाडी कोविड सेंटरला अप्पर जिल्हाधिकारी जोशी यांची भेट..

आहार, औषधोपचार बाबत दिल्या सूचना

वैभववाडी/पुढारी वृतसेवा:वैभववाडी तालुक्यात गेले काही दिवसापूर्वीं कोरोना संसर्ग वाढला होता.दिगशी,सोनाळी, नावळे गाव कोरोना हॉट स्पॉट झाले होते. कोरोना बाधित लोकांना सांगूळवाडी येथील कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.शुक्रवारी दुपारी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे अप्पर जिल्हाधिकारी मंगेश जोशी यांनी सांगूळवाडी कोविड सेंटरला भेट दिली.कोरोना बाधित रुग्णांना सकस आहार व औषधोपचार वेळेत द्या अशा सूचना डॉक्टर व अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी आरोग्य विभागाचा व कोविड सेंटरमधील दैनंदिन कामकाजाचा आढावा घेतला. तालुक्यात सध्या 226 कोरोना सक्रिय रुग्ण आहेत.सांगूळवाडी कोविड सेंटरमध्ये या सर्व रुग्णांची व्यवस्था केली जात आहे.वैभववाडी तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांसाठी शासकिय स्तरावरून वेळोवेळी दखल घेतली जात आहे.यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी प्रशांत पानवेकर ,वैभववाडी तहसीलदार रामदास झळके,नायब तहसीलदार अशोक नाईक,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अनिल पवार,डॉ. सयाजी धर्मे,मंडळ अधिकारी पावसकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page