पोलिसांची घटनास्थळी धाव ; बॅगची तपासणी करून बॅग घेतली ताब्यात..
कणकवली : शहरातील बस स्थानकासमोर असलेल्या सर्विस रस्त्यांच्या फूटपाथवर एक मोरपंखी आकाशी रंगांची अज्ञात सुटकेस बॅग सापडली आहे. सध्याच्या गंभीर परिस्थितीचे गांभीर्य घेत येथील जागरूक नागरिकांनी याबाबत ची माहिती कणकवली पोलिसांना दिली. त्यानंतर कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार अमित खाडये, पूजा तोरस्कर, चालक मकरंद माने यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान यावेळी पोलिसांकडून बॅग ची तपासणी करण्यात आली असता, बॅग ला एका कप्प्याला लॉक असल्याचे दिसून आले. तर काही कप्प्यांची तपासणी केली असता पांढरा रुमाल दिसून आला.
याबाबत आसपासच्या परिसरात चौकशी केली असता बॅग मालक कोणी सापडले नाहीत. त्यामुळे पोलिसांनी सदरची बॅग ताब्यात घेत पोलीस ठाण्यात नेली.
मात्र या घटनेने परिसरात भीतीदायक चर्चा सुरू झाल्या होत्या. ती बॅग नेमकी कोणाची असेल ? बॅग च्या आत काय असेल ? बागेत बॉम्ब तर नाहीय ना ? या दृष्टीने पोलिसांनी तपासणी केली मात्र त्यात काही दिसून आले नाही.
