⚡मालवण ता.०७-:
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत देव रवळनाथ ग्रामसंघ तसेच पावणाई ग्रामसंघ यांच्यातर्फे रविवार दि. ९ मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त गोळवण ग्रामपंचायत सभामंडपात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त सकाळी ८.३० वाजता प्रभात फेरी, ९ वाजता मान्यवरांचे स्वागत, ९.३० वा. अल्पोपहार, सकाळी १० ते दुपारी १ वा. सांस्कृतिक कार्यक्रम, दुपारी १ ते २ वा. सहभोजन, आदी कार्यक्रम होणार आहेत. ग्रामसंघास जोडलेले सर्व समूह तसेच समूहातील पदाधिकारी व समूहातील सर्व सदस्य, सीआरपी कर्मचारी यांनी कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन देव रवळनाथ ग्रामसंघ, गोळवण-डिकवल अध्यक्षा प्रज्ञा चव्हाण, पावणाई ग्रामसंघ कुमामे अध्यक्षा मैथिली चव्हाण यांनी केले आहे.
