मसुरे डांगमोडे येथे महिला आणि पुरुष गटाच्या ८ मार्च रोजी कबड्डी स्पर्धा…

मालवण दि प्रतिनिधी
नवतरुण मित्र मंडळ डांगमोडे यांच्या वतीने आयोजित आणि सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनच्या मान्यतेने पुरुष व महिला कबड्डी स्पर्धा दि.८ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता मसुरे डांगमोडे रवळनाथ मंदिर येथे श्री भवानी मातेच्या वार्षिक गोंधळ उत्सवानिमित्त आयोजित करण्यात आली आहे.

या वेळी विजेत्या पुरुष गटासाठी प्रथम क्रमांक ७०००/- रुपये व चषक, द्वितीय क्रमांक ५०००/- रुपये व चषक, उत्कृष्ट चढाई, उत्कृष्ट पकड व अष्टपैलू खेळाडूंना प्रत्येकी ५००/-रुपये रुपये व चषक देण्यात येणार आहे. तर महिला गटासाठी प्रथम क्रमांक ७०००/- रुपये व चषक, द्वितीय क्रमांक ५०००/- रुपये व चषक तसेच उत्कृष्ट चढाई, उत्कृष्ठ पकड व अष्टपैलू खेळाडू यांना प्रत्येकी ५००/- रुपये व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेतील सर्व चषक कै. शिवाजी गंगाराम ठाकूर यांच्या स्मरणार्थ पुरस्कृत करण्यात आले आहेत. स्पर्धेदरम्यान सर्व खेळाडू आणि सहभागी कबड्डी हितचिंतक यांची मोफत भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. स्पर्धा सायंकाळी सहा वाजता सुरू होईल. या स्पर्धेचे उद्घाटन माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांच्या शुभहस्ते होणार असून यावेळी मालवण कुडाळ मतदार संघाचे आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, शिवसेना नेते संजय आंग्रे, नवतरुण मित्र मंडळ डांगमोडे चे सर्व पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. महिला आणि पुरुष कबड्डी स्पर्धेसाठी स्पर्धक संघाने नितीन हडकर मो. 7249357239, दत्तप्रसाद पेडणेकर मो. 9421145827 संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे

You cannot copy content of this page