आंगणेवाडी हिरक महोत्सव एकांकिका स्पर्धेत भाईंदरची ‘पाटी’ प्रथम…

⚡मालवण ता.०४-: कोकणची भूमी ही नाट्यकलावंताची भूमी आहे, या मातीने नाटकावर आणि लोककलेवर केलेले प्रेम हे कलावंत आणि इथल्या समाज रचनेच्या प्रेक्षक या दोघाच्या अतुट नाट्यप्रेमाची गोष्ट आहे. शहरी कलावंतानी ग्रामीण रंगमंचावर येताना नाट्यकलाकृतीची अवीट गोडी तेवढ्याच ताकदीने मांडली पाहिजे. आजही पुण्यामुंबईपेक्षाही गावखेड्याने यात्रा वार्षिकाच्या निमित्ताने जपलेली नाट्यसंस्कृती ज्यावेळी आपण कलावंत म्हणून समजून घेऊ त्याचवेळी खऱ्या अर्थाने कलावंत म्हणून ग्रामीण मंचाची ताकद किती मोठी आहे हे समजून येईल असे प्रतिपादन पत्रकार ऋषी देसाई यांनी आंगणेवाडी एकांकिका महोत्सवाच्या निमित्ताने केले.

मालवण तालुक्यातील आंगणेवाडी नाट्यमंडळ मुंबईच्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त मुंबई, पुणे, कोल्हापूर येथे विविध एकांकिका स्पर्धेत नावाजलेल्या एकांकिकेचा एकांकिका स्पर्धा महोत्सव आंगणेवाडी येथे पार पडला त्याच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमात श्री देसाई हे बोलत होते यावेळी या स्पर्धेत एकदम कडक नाट्यसंस्था भाईंदर संस्थेच्या पाटी एकांकिकेला प्रथम पुरस्काराने गौरवण्यात आले , तर कलादर्शन पुणे निर्मित बॉईल्ड – शुद्ध शाकाहारी एकांकिकेला द्वितीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.

यावेळी व्यासपीठावर आंगणेवाडी मंडळाचे अध्यक्ष सतीश आंगणे, सचिव अर्जुन आंगणे, कार्याध्यक्ष सीताराम आंगणे, गजानन आंगणे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते

यावेळी परिक्षक महेश सावंत पटेल यांनी अशा प्रकारच्या दर्जेदार एकांकिका महोत्सवाचे आयोजन गावागावात व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त करताना महोत्सव दरवर्षी आंगणेवाडीत आयोजित करण्यात यावा ही भावना व्यक्त केली.

या एकांकिका स्पर्धेत कलांश थिएटर यांची क्रॅक इन द मिरर, एकदम कडक नाट्यसंस्थेची पाटी, जिराफ थिएटर यांची गुडबाय किस , कलादर्शन पुणे यांची बॉईल्ड शुद्ध शाकाहारी , गायन समाज देवल क्लब कोल्हापूर यांची ऑलमोस्ट डेड एकांकिका सादर करण्यात आली .

या स्पर्धेसाठी ख्यातनाम दिग्दर्शक महेश सावंत पटेल आणि पत्रकार ऋषी देसाई यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवेदक अक्षय सातार्डेकर यांनी केले

स्पर्धेचा निकाल

या एकांकिका स्पर्धेत उपविजेते संघ म्हणून गुड बाय किस, क्रॅक इन द मिरर, आणि ऑलमोस्ट डेड या एकांकिकेना गौरवण्यात आले. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन प्रणय गायकवाड (पाटी ), सर्वोत्कृष्ट लेखन भावेश आमडस्कर (पाटी), सर्वोत्कृष्ट अभिनेता – औंदुबर बाबर (पाटी ), सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – ऋतुजा बोटे (बॉईल्ड ) – सर्वोत्कृष्ट बालकलाकार – देव चोपडे यांना पारितोषिकांने गौरवण्यात आले.

You cannot copy content of this page