सांगुळवाडी ‘शिव महोत्सव’ला उत्फुर्त प्रतिसाद…!

⚡वैभववाडी ता.२१-: छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या कार्याचा आवका एवढा मोठा आहे. तो सर्वच क्षेत्राना व्यापून टाकणारा आहे. त्यामुळे त्यांना  जात धर्म,प्रांत यात अडकवू नका. असे प्रतिपादन निवृत्त उपमुख्य अभियंता बृहन्मुंबई महानगरपालिका संजय जाधव यांनी केले.
       सांगुळवाडी ग्रामस्थ आयोजित शिव महोत्सव सांगुळवाडी 2025 या महोत्सवाचे हे सातवे वर्ष. या निमित्ताने ‘राष्ट्रमाता जिजाऊ नगरी’ पू . प्राथ.शाळा सांगुळवाडी नं. १ येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून जाधव बोलत होत.
  शिवमहोत्सवाच्या सुरुवात  ‘शिव अभिवादन रॅली’ने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. निवृत्त उपमुख्य अभियंता बृहन्मुंबई महानगरपालिका संजय जाधव  यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी त्यांनी शिवाजी महाराजांचे जीवन चरित्र सांगितले.इयत्ता दहावी बारावीतील उत्तीर्ण विद्यार्थी तसेच प्राथमिक शाळांतील वर्षभरात विशेष प्राविण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. सालाबादप्रमाणे, गावासाठी विविध क्षेत्रांत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तींमध्ये प्रफुल्ल बळीराम रावराणे (सहकार क्षेत्र ) यांना ‘शिवसन्मान ‘ तर क्षमा संतोष सुतार (सीआरपी बचतगट) व अनघा उदय पाटील, युवा उद्योजिका यांना ‘शिवसत्कार ‘ करून गौरविण्यात आले. पोलीस पाटील पदी नव्याने नियुक्त झालेले मेघ:श्याम शरद रावराणे व समुदाय आरोग्य अधिकारी ज्योत्स्ना सत्यवान पाटील यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. रात्री लोकशाहीर सदाशिव निकम, कोल्हापूर यांनी शिवजागर पोवाडा सादर केला.
यावेळी विचारमंचावर माजी सरपंच सज्जनकाका रावराणे, सर्व सत्कारमूर्ती, शा.व्य समिती अध्यक्ष समीर रावराणे, ग्रामपंचायत सदस्य गौरी रावराणे, सत्यवान सुतार,स्नेहल भोवड, वंदना लाड, पूजा रावराणे,  ग्रामपंचायत अधिकारी विद्याधर सावंत, मुख्याध्यापक स्नेहलता राणे, तंटामुक्त समिती अध्यक्ष अरविंद रावराणे, प्रकाश पाटील, प्रेमानंद रावराणे, प्रकाश अडुळकर, विश्राम राणे आदी मान्यवर उपस्थित होते.
   कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावातील युवावर्ग व ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतले.
चौकट..
शिवमहोत्सवाच्या पूर्वदिनी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन सरपंच बाळाजी रावराणे यांच्या हस्ते झाले. यात 32 रक्तदात्यांनी रक्तदान केले.

You cannot copy content of this page