विद्यार्थ्याला बेदम मारहाण करणाऱ्या ‘त्या’ मुख्याध्यापकाला मनसेचा दणका…

बांदा : प्रतिनिधी

शालेय विद्यार्थ्याला बेदम मारहाण करणाऱ्या ‘त्या’ मुख्याध्यापकाला प्रशालेच्या कार्यालयात मनसे पदाधिकाऱ्यांनी फैलावर घेत जाब विचारला. शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकाऱ्यांचेही कान टोचले. त्या मुख्याध्यापकाची तातडीने बदली करावी अशी मागणी करण्यात आली. याबाबत येत्या मंगळवारी गटविकास अधिकारी व शिक्षण विभाग अधिकारी यांच्या समवेत प्रशालेत संयुक्त बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

You cannot copy content of this page