बेपत्ता युवकाचा मृतदेह जंगलात आढळला…

कणकवली : गेल्या बारा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या नीलेश नारायण पुजारे ( वय ३६, रा. कणकवली -विद्यानगर) यांचा मृतदेह नागवे रोड नजीकच्या जंगलमय परिसरात पूर्णपणे कुजलेल्या स्थितीत झाडाला लटकलेला आढळून आला. ही घटना बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास उघडकीस आली. नागवे रोड नजीकच्या जंगलमय भागात काही नागरिकांना कुजलेला वास येत असल्याने त्यांनी याबाबतची माहिती बुधवारी सायंकाळी कणकवली पोलिसांना दिली. अधिक तपास कणकवली पोलीस करत आहेत.

You cannot copy content of this page