आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या पोभुर्ले गावी संपूर्ण देशाला आदर्श ठरेल असे स्मारक उभे करू…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याठिकाणी आणण्याचा केला संकल्प:देवगड तालुका पत्रकार समितीच्या वृत्तीने आयोजित जांभेकर जयंती कार्यक्रमादरम्यान नामदार नितेश राणे यांनी केले प्रतिपादन..

⚡देवगड ता.२०-: “वृत्तपत्र सृष्टीचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या पोंभुर्ले या गावी संपूर्ण देशाला आदर्श ठरेल असे स्मारक उभे करू, याठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आणण्याचा आपला संकल्प असून त्या दृष्टीने आपण प्रयत्नशील आहोत.बाळशास्त्रीनी त्यांच्या लहान वयातच केलेल्या कामाचा परिचय होऊ शकेल या पद्धतीने स्मारकाचे महत्व वाढविणार आहे.आजच्या कार्यक्रमाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारांनी जो एकत्र येत एकसंघ दाखविला तो निश्चितच कौतुकास्पद आहे. आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचे गाव सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत हे जिल्ह्यासाठी ॲसेट असल्याचे मत मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केले.

वृत्तपत्र सृष्टीचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती त्यांच्या मूळ गावी, पोंभुर्ले येथे साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.यावेळी त्यांच्यासोबत माजी आमदार अजित गोगटे, जिल्हाधिकारी अनिल पाटील, तहसीलदार आर. जे. पवार, सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष उमेश तोरस्कर, गणेश जेठे,देवगड तालुका पत्रकार समितीचे तालुकाध्यक्ष अयोध्याप्रसाद गावकर,माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, गावच्या सरपंच प्रियांका धावडे,सुधाकर जांभेकर, उपसरपंच सादिक डोंगरकर, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस संदीप साटम व अनेक पत्रकार, शासकीय अधिकारी उपस्थित होते.

जिल्हा तालुका पत्रकार संघातील पत्रकारांनी एकत्र बसून याबाबत सविस्तर चर्चा करा.तर मलाही आवडेल.जागा, संबंधित विषय आता तुम्ही मार्गी लावणे गरजेचे आहे. कारण आता आपणाला थांबायचे नाही,
जिल्ह्यातील पत्रकार भवन ज्या पद्धतीत उभे केले त्याप्रमाणे ही देखील आपणाला लवकर मार्गी लावायचे आहे.त्यामुळे आता मी थांबणारा नाही.या स्मारकासाठी लागणारा सर्व निधी व मदत आपण द्यायला तयार आहोत,” असे नामदार नितेश राणे यांनी सांगितले.

यावेळी देवगड तालुका पत्रकार समिती व जांभेकर कुटुंबियांच्या वतीने मंत्री
नितेश राणे, जिल्हाधिकारी अनिल पाटील,तसेच उपस्थित मान्यवरांचा सम्मान करण्यात आला.यावेळी
ज्येष्ठ पत्रकार माधव कदम यांनी
बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रवासावर आधारित लिहिलेल्या पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन यावेळी करण्यात आले.

पत्रकारिता काय असावी , त्यातून कशी समाजसेवा करावी याचे प्रबोधन त्यांनी दर्पण मधून केले,मराठी बरोबर त्याची इंग्रजी आवृत्ती सुरू केली त्याला त्या काळी खूप मागणी देखील असायची.
इतक सुंदर लेखन त्यामध्ये असायचे नाव दर्पण होत त्यानुसार तो आरसा होता आता त्या पद्धतीने काम व्हायला पाहिजे .समाजकारण,राजकारण करत असताना आपला चौथा पिलर आहे तो विसरू नये.सरकार, शासन, प्रशासन , न्याय व्यवस्था याकडून काही चुका होत असल्या तर त्या आपण दाखविल्या पाहिजेत असे मत जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी व्यक्त केले.

बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली.जिल्हाभरातील पत्रकार यावेळी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनघा मगदूम यांनी केले.उपस्थितांचे आभार श्रीकृष्ण रानडे यांनी व्यक्त केले.

You cannot copy content of this page