⚡मालवण ता.१९-:
मालवण एसटी स्टँडनजीकच्या श्रीराम मंदिर येथे श्री गजानन महाराज शेगाव प्रकटदिन सोहळा उद्या गुरुवार दि. २० फेब्रुवारी रोजी साजरा होणार आहे.
यावेळी सकाळी ६ ते दुपारी १२ वाजेपर्यंत श्री गजानन विजय ग्रंथाचे साखळी पारायण, ८ वाजता महापूजा, दुपारी १२ वाजता महाआरती व नैवेद्य, १ वाजता झुणका भाकरी प्रसादाचे वाटप, तीर्थप्रसाद, ५ वाजता श्री स्वामी कृपा महिला वारकरी दिंडी भजन कातवड यांचे दिंडी भजन (बुवा मंगेश नलावडे), ७वाजता श्री गजानन महाराज शेगाव प्रकटदिन देखावा, ७.३० वाजता श्री देवेंद्र मोरेश्वर नाईक प्रस्तुत चेंदवणकर दशावतार नाट्यमंडळाचा ट्रिकसीनयुक्त ‘क्षेत्रपाल श्री देव वेतोबा’ हा नाट्यप्रयोग होणार आहे. लाभ घ्यावा, असे आवाहन श्री क्षेत्र गजानन महाराज शेगाव भक्त मंडळातर्फे करण्यात आले आहे.