⚡सावंतवाडी ता.१९-: भालेकर खानावळ चे मालक व परीट समाजाचे तालुकाध्यक्ष श्री राजू भालेकर यांच्या मातोश्री श्रीमती सुलोचना गजानन भालेकर ( वय 80) यांचे काल रात्री 1 वाजण्याच्या सुमारास वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. आज दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. परीट समाजाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालेकर यांच्या त्या काकी होत्या. तर माजी नगरसेविका दीपाली भालेकर यांच्या त्या चुलत सासू होत्या. त्यांच्या पश्चात मुलगा, मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
राजू भालेकर यांना मातृशोक…
