जत येथील बालिकेवरील अत्याचाऱ्याना फाशी द्या…

महिला अत्याचार संघर्ष समितीची मागणी..

सिंधुदुर्गनगरी ता १८
सांगली जिल्ह्यातील जत करजगी या गावात चार वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करून तिचा निर्गुण खून करणाऱ्या गुन्हेगाराला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा महिला अत्याचार संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे

सांगली जिल्ह्यातील जत करजगी या गावात काही दिवसापूर्वी चार वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करून तिचा निर्घृण खुन केल्याची घटना घडली आहे. सदर घटना माणुसकीला काळीमा फासणारी व संताप जनक अशी आहे. सदर घटनेतील आरोपी पांडुरंग सोमसिंग कळळी या आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी . अशी मागणी करणारे निवेदन आज सिंधुदुर्ग जिल्हा महिला अत्याचार संघर्ष समितीचे दीपक जाधव, वासंती परुळेकर, दिव्या राऊळ, महिमा कदम, वैशाली लाड, प्रमिला देवरुखकर, सत्यवान तेंडुलकर ,सत्यवान भगत, अनया कुलकर्णी, यांनी निवासी उप जिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांच्याकडे सादर केले.

You cannot copy content of this page