नृत्यांगना दीक्षा नाईकच कुडाळ मध्ये भव्य स्वागत…

दिक्षाची ‘सुंदरी’ या शो मध्ये निवड:स्वागतासाठी चिमणी पाखरं अकादमीचा पुढाकार..

कुडाळ : मराठी नृत्य इंडस्ट्रीमध्ये पाऊल टाकणारी तसेच मराठी, हिंदी फिल्म इंडस्ट्रीमधील सुप्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक आशिष पाटील यांच्या ‘ सुंदरी ‘ या सेलिब्रिटी कलाकारांच्या शोमध्ये निवड झालेली सिंधुदुर्ग जिल्ह्यातली पहिली नृत्यांगना दिक्षा प्रमोद नाईक ही निवड झाल्यानंतर पहिल्यांदाच कुडाळमध्ये आली. यावेळी चिमणी पाखरं डान्स अकॅडमीच्या वतीने तिचे ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले.
दिक्षाच पहिल पाऊल कुडाळ रेल्वे स्थानकावर पडताच चिमणी पाखरं डान्स अकॅडमीच्या सर्व टीमने ढोल ताशांच्या नृत्याचा ठेका धरत दिक्षाचे स्वागत केले.
यानंतर उपस्थित सर्व महिलांनी औक्षण करत तिला शुभेच्छा दिल्या. यानंतर चिमणी पाखरं डान्स अकॅडमीचे खजिनदार तथा सामाजिक कार्यकर्ते सुनिल भोगटे यांनी शाल व श्रीफळ देऊन तिला सन्मानित केले.
कुडाळवासियांनी दिलेले प्रेम केलेल स्वागत स्वागत पाहून दिक्षा चांगलीच भावूक झाली. तर लेकीच यश पाहून दिक्षाच्या आईच्या डोळ्यातून आनंदाश्रू तरळल.
सुप्रसिद्ध कोरियोग्रागर आशिष पाटील यांच्यासोबत काम करण्याचं माझ स्वप्न असून ते आज पूर्ण झाले असल्याच दिक्षाने यावेळी सांगितले. तसेच आपल्या यशाचे सर्व श्रेय तिने चिमणी पाखरं डान्स अकॅडमी आणि अकॅडमीचे संचालक रवी कुडाळकर सरांना दिले.
तर चिमणी पाखरं डान्स अकॅडमीचे संचालक रवी कुडाळकर यांनी दिक्षाला संधी दिल्याबद्दल कोरियोग्राफर आशिष पाटील यांचे जील्हावसियांच्या वतीने आभार मानले. तसेच दीक्षाच्या आई – वडिलांचे देखील कौतुक केले.
दिक्षाने घेतलेल्या उत्तुंग अशा गगनभरारीमुळे कुडाळसह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात अभिमानाचा तुरा खोवला गेला आहे एवढं मात्र नक्की.

You cannot copy content of this page