मळगाव येथील ‘राष्ट्रोळी क्रिकेट लीग’ स्पर्धेचे संजय धुरी यांच्या हस्ते उद्घाटन…!

⚡सावंतवाडी ता.१५-: राष्ट्रोळी कला आणि क्रीडा मंडळ आयोजित राष्ट्रोळी क्रिकेट लीग २०२५ च्या पर्व ९ चे उद्घाटन आझाद मैदानावर मळगाव तंटामुक्ती समिती अध्यक्ष श्री.संजय धुरी यांच्या हस्ते करण्यात आले.
दोन दिवसीय या लीग स्पर्धेत एकूण आठ संघ मैदानावर उतरणार असून १०० पेक्षा जास्त खेळाडुंचा भरणा आहे. या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक भिल्लवाडी गृप अध्यक्ष श्री.पांडुरंग राऊळ यासंकडून रोख रुपये २५,०००/- तर द्वितीय पारितोषिक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सावंतवाडी तालुका संपर्क प्रमुख श्री.रुपेश राऊळ यांच्याकडून रोख रुपये १५,०००/- , विजेत्या, उपविजेत्या संघासाठी कायमस्वरूपी आकर्षक चषक ठेवण्यात आले आहेत, याव्यतिरिक्त मालिकावीर, सामनावीर, उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज यांना रोख रक्कम व आकर्षक चषक देण्यात येणार आहेत.
स्पर्धेचे उद्घाटन आज सकाळी मळगाव येथील आझाद मैदानावर मळगाव तंटामुक्त समिती अध्यक्ष श्री.संजय धुरी यांच्या शुभहस्ते छञपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन तसेचं मैदानावर श्रीफळ फोडून करण्यात आले. यावेळी राजन पडवळ, ज्ञानेश्वर राऊळ, प्रितम पांढरे, शशिकांत राऊळ, रामा राऊळ, पंढरीनाथ गावकर, सुधीर राऊळ, यांच्यासह ज्ञानदीप कला आणि क्रीडा मंडळ चे कार्यकर्ते नितेश तेली, प्रसाद राऊळ, अक्षय राऊळ, सिद्धेश राऊळ, निखील पुळास्कर, लवू राऊळ, लिलाधर गावकर, गोट्या कोरगांवकर, प्रथमेश राऊळ सह स्पर्धेतील संघ मालक व क्रीडा प्रेमी उपस्थित होते.

You cannot copy content of this page