संत राऊळ महाराज महाविद्यालयामध्ये DST इन्स्पायर कॅम्पचा समारोप…

सहभागी विद्यार्थ्यांनी दिले लक्षवेधी अभिप्राय..

कुडाळ : भारत सरकारच्या विज्ञान तंत्रज्ञान विभागाच्या वतीने संत राऊळ महाराज महाविद्यालय येथे पाच दिवसीय DST इन्स्पायर कॅम्पचा मान्यवरांच्या उपस्थितीत नुकताच समारोप झाला. क.म.शि.प्र.मंडळाचे उपकार्याध्यक्ष अरविंद शिरसाट यांनी समारोप कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे पद्मश्री परशुराम गंगावणे यांच्यासह क.म. शि.प्र.मंडळाचे उपकार्याध्यक्ष अरविंद शिरसाट, प्रोफेसर भास-बापट, डॉ.मनवा दिवेकर, श्रीमती सुषमा केणी, समन्वयक डॉ.वाय.जे. कोळी आदी मान्यवर उपस्थित होते. आपले मनोगत व्यक्त करताना परशुराम गंगावणे म्हणाले, प्राचीन कलेचा वारसा जपा, खूप शिका, तुम्ही खूप मोठे व्हा, तुमच्या पालकांना तुम्ही विसरू नका असे सांगत मागे वळून पाहण्याचे आवाहन उपस्थित विद्यार्थ्यांना त्यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष क.म. शि.प्र.मंडळाचे उपकार्याध्यक्ष अरविंद शिरसाट यांनी सर्वप्रथम महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.स्मिता सुरवसे तसेच शिबिरार्थी व आयोजनातील सर्वांचे संस्थेच्या वतीने अभिनंदन व कौतुक केले. येथे आलेली तज्ज्ञ संशोधक मंडळी तुम्हाला ज्ञान देण्यासाठी आलेली आहेत .विचार करण्याची शक्ती संपादित करून संशोधनाचा समाजासाठी वापर करा तसेच असाध्य रोगांसाठी संशोधनाची अधिक गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. तुम्ही कुटुंबाच्या दृष्टीने विश्व आहात जीवन आनंद घेण्यासाठी आणि वाटण्यासाठी आहे असे त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना सांगितले.
महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.स्मिता सुरवसे यांनी उपस्थित मान्यवरांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तसेच आपल्या मनोगतामध्ये कॅम्प यशस्वी होण्यासाठी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष योगदान देणाऱ्या सर्वांचे ऋण व्यक्त केले.
समारोप कार्यक्रमाचे खास आकर्षण ठरले ते विद्यार्थ्यांचे लक्षवेधी अभिप्राय .कॅम्प मधील प्रात्यक्षिके आवडली,आयोजन मस्तच .- समृद्धी पाटील(गडहिंग्लज), ग्रामीण भागातून आलो खूप माहिती मिळाली- राखी नवार(आजरा), कॅम्पमध्ये मोटिवेशन मिळाले -ध्रुव पाध्ये (सोमय्या कॉलेज), खूप चांगल्या नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या-निकिता (जोशी अभ्यंकर कुलकर्णी कॉलेज), खूप समजावून सांगितले-हर्ष परब (पणदूर हायस्कूल), शास्त्रज्ञ हा किती प्रभावी व्यक्तिमत्व असते हे इथे येऊन कळाले-भार्गव चिंचोलीकर( पुणे), प्रयोगाच्या वेळी शाळेतील स्लाईडच्या गमती कराडच्या कल्याणी तालस्कर हिने सांगितल्या, कणकवलीच्या वरदा फणसळकर हिने व्यवस्थापन, ऊर्जा आणि संशोधक याबद्दल अभिप्राय व्यक्त करत प्रशिक्षकांची व स्वयंसेवकांची प्रशंसा केली . आर .पी.डी. सावंतवाडीच्या पियुष माळकर याने आपल्यातील सुप्त गुणांचे वर्णन करत येथील कॅम्प आपल्याला काय देऊन गेला याबद्दल सांगितले .सर्वांचे अभिप्रायामध्ये कॅम्प खूप छान झाला ,लय भारी झाला असे अभिप्राय मिळाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.आर.वाय. ठाकूर यांनी केले. त्यामधील काही गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

You cannot copy content of this page