दिल्लीतील निर्विवाद यशाचा जिल्ह्यात भाजपकडून जल्लोष…

सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा कार्यालयात पेढे भरवत आनंद केला साजरा:जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, सरचिटणीस रणजीत देसाई यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांचा समावेश..

ओरोस ता ८
आज दिल्ली येथे भाजपचे बहुमताचे सरकार आले 70 पैकी 45 उमेदवार निवडून आले. या भाजपच्या यशाचा जल्लोष महाराष्ट्रात सर्व ठिकाणी करण्यात आला. सिंधुदुर्गनगरी येथील वसंत स्मृती या सिंधुदुर्ग भाजप जिल्हा कार्यालय येथे भाजपा जिल्हा पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी जल्लोष केला. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, सरचिटणीस रणजीत देसाई, कुडाळ मंडल अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, रुपेश कानडे, पप्या तवटे, सुनील बांदेकर, सरपंच परशुराम परब, सुभाष बांबुळकर, गौरव घाडी, महिला ओरोस मंडल अध्यक्षा सुप्रिया वालावलकर, जिल्हा कार्यालय प्रमुख समर्थ राणे, अजय घाडीगांवकर, अक्षय दळवी, श्रेयस पेडणेकर आणि पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

फोटो ओळ:- सिंधुदुर्गनगरी:

You cannot copy content of this page