राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत खेमराजचा प्रणव गवस राज्य स्तरावर प्रथम…

⚡बांदा ता.०८-: अकोला येथे नुकत्याच संपन्न झालेल्या राज्य स्तरीय शालेय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत सिंधुदूर्ग जिल्यातील विविध वजनी गटांमध्ये 11 खेळाडूंची निवड झाली होती. विभागीय स्पर्धेत अव्वल कामगिरी करणाऱ्या या खेळाडूंनी राज्य स्तरावर सुध्दा सिंधुदूर्ग जिल्याचे उत्तम प्रतिनिधित्व केले. खेमराज मेमोरिअल इंग्लिश स्कूल व डॉ व्ही. के.तोरसकर कनिष्ठ महाविद्यालय बांदाचा वाणिज्य शाखेचा खेळाडू विद्यार्थी प्रणव भिकाजी गवस याने 66 कीलो वजनी गटात राज्य स्तरावर प्रथम क्रमांक मिळवून सिंधुदुर्गचे तसेच बांदा हायस्कूलचे नाव उज्वल केले आहे.

बांदा हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक नंदकिशोर नाईक, क्रीडा शिक्षिका सुमेधा सावळ सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून प्रणवचे अभिनंदन होत आहे. तर बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा कल्पनाताई तोरसकर, कार्याध्यक्ष डॉ. मिलींद तोरसकर यांनीही प्रणव गवस याचे विशेष अभिनंदन केले आहे.

You cannot copy content of this page