⚡मालवण ता.०७-:
नुकत्याच दिल्ली येथे झालेल्या प्रजासत्ताक दिन संचलनासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून एकमेव निवड झालेला आणि महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केलेला मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचा एनसीसी विभागाचा विद्यार्थी राहुल चव्हाण याचे आज दिल्लीहून मालवणात आगमन झाल्यानंतर मालवण शहरातून त्याची भव्य गौरव रॅली काढण्यात आली. राहुल याने आपल्या कामगिरीने मालवणसह सिंधुदुर्ग जिल्ह्याची मान उंचावली असून याबद्दल राहुल याचा सार्थ अभिमान असल्याचे कौतुकोद्गार यावेळी उपस्थित समस्त मालवणवासियांनी काढत राहुल याचे जंगी स्वागत केले.
राहुल चव्हाण याचे आज सकाळी मालवण मध्ये आगमन होताच मालवण शहराचे प्रवेशव्दार असलेल्या कुंभारमाठ येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास राहुल याच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी राहुल याने छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा जोरदार घोषणा दिल्या. यावेळी कुंभारमाठ येथे उपस्थित अनेक मान्यवरांनी, संस्था प्रतिनिधी व नागरिकांनी राहुल याला पुष्पहार घालून त्याचे अभिनंदन व स्वागत केले. त्यानंतर सजविलेल्या गाडीतून कुंभारमाठ येथून देऊळवाडा ते भरड नाका येथून बाजारपेठ मार्गे फोवकांडा पिंपळ ते कन्याशाळा मार्गे स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय अशी राहुल याची गौरव रॅली काढण्यात आली. यावेळी समस्त मालवणवासीय मोटासायकल घेऊन रॅलीत सहभागी झाले होते. या रॅलीत ठिकठिकाणी नागरिकांनी राहुल याचे स्वागत केले.
या रॅलीत राहुल याची आई सौ. उषा चव्हाण, वडील उदय चव्हाण, भाऊ भूषण चव्हाण, यांच्यासह सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे प्राचार्य शिवराम ठाकूर, ५८ महाराष्ट्र बटालियनचे कर्नल दीपक दयाल, एनसीसी विभाग प्रमुख लेफ्टनंट प्रा. डॉ. एम. आर. खोत, कृ.सी. देसाई शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष बाळासाहेब पंतवालावलकर, सेक्रेटरी गणेश कुशे, सीडीसी अध्यक्ष ॲड. समीर गवाणकर, साईनाथ चव्हाण, विजय केनवडेकर, माजी प्राचार्य श्रीपाद गीरसागर, सुदेश आचरेकर, विजय चव्हाण, अभय कदम, संतोष लुडबे, दादा वेंगुर्लेकर, जेष्ठ पत्रकार प्रफुल्ल देसाई ,अमेय देसाई, प्रा. सुमेधा नाईक, सौ. शिल्पा खोत, सौ. फॅनी फर्नांडीस, महेश कारेकर, उत्तम पेडणेकर लक्ष्मीकांत खोबरेकर, सुधीर धुरी, प्रदीप नाईकसाटम, ललित चव्हाण, शुभम सकपाळ, किसन मांजरेकर, रविकिरण तोरसकर, भाऊ सामंत, शैलेश पावसकर, रुजारिओ पिंटो, कुंभारमाठ सरपंच पूनम वाटेगावकर, प्रभाकर देऊलकर, उमेश मांजरेकर, वाहतूक पोलीस श्री. परब, पत्रकार मनोज चव्हाण,भूषण मेतर मालवण नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी आदी तसेच सिंधुदुर्ग कॉलेजचे सर्व प्राध्यापक, एनसीसी कॅडेट, विद्यार्थी विद्यार्थिनी, मालवणातील सामाजिक संस्था नागरीक यांनी या रॅलीत सहभागी होत राहुल याचे स्वागत केले.
रॅलीनंतर सिंधुदुर्ग महाविद्यालयात राहुल चव्हाण याचा बाळासाहेब पंतवालावलकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ घेऊन सत्कार करण्यात करण्यात आला. तसेच राहुल याचे आई वडील आणि राहुलच्या यशात मेहनत घेणारे कर्नल दीपक दयाल, सुभेदार मेजर, कॉलेजचे एनसीसी प्रमुख लेफ्टनंट डॉ. एम. आर. खोत यांचाही सत्कार करण्यात आला.
यावेळी सत्काराला उत्तर देताना राहुल चव्हाण म्हणाला, प्रजासत्ताक दिन परेड मध्ये पोहचण्यापर्यंतचा प्रवास खडतर होता, अनेक टप्प्यावर निवड प्रक्रिया पार करत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मला मिळाली. दिल्लीत थंडीच्या हवामानात शिस्तबद्ध आणि मेहनतीने प्रशिक्षण पूर्ण करत परेड यशस्वी करत महाराष्ट्राला तिसरा क्रमांक मिळवून दिला. या यशात आई वडील, ५८ महाराष्ट्र बटालियनचे अधिकारी, एनसीसी अधिकारी व कॉलेज यांचे योगदान आहे. इतर एनसीसी कॅडेटसने देखील मेहनत करत राहावी, असेही राहुल चव्हाण म्हणाला. यावेळी कर्नल दीपक दयाल, श्रीपाद गीरसागर, बाळासाहेब पंतवालावलकर, प्राचार्य डॉ. शिवराम ठाकूर यांनी मनोगत व्यक्त करत राहुल याचे कौतुक केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. सुमेधा नाईक यांनी केले तर आभार डॉ. खोत यांनी मानले.
