सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष पदी समिल जळवी यांची बिनविरोध निवड…

⚡ओरोस ता.०७-: सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष पदी श्री.समिल प्रभाकर जळवी यांची भंडारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवार दिनांक 06.02.2024.रोजी महासंघाचे अध्यक्ष श्री.हेमंत करंगुटकर पदाधिकारी यांच्या उपस्थितीत समिल जवळी यांची निवड केली आहे.गेली अनेक वर्षें सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाचे तसेच कुडाळ तालुका भंडारी महासंघाचे श्री.समिल जळवी भंडारी समाजाचे तळमळीने आणि निस्वार्थी कार्यपद्धतीने काम करत होते.समिल जळवी यांचा संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भंडारी समाज बांधवांचा संपर्क हा दांडगा आहे.त्यामुळे भंडारी समाजाला एकत्रित ठेवण्यातच्या दृष्टीकोनातून त्यांची भंडारी समाजाच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष पदी समिल जळवी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

यावेळी महासंघाचे सिंधुदुर्ग जिल्हातील जिल्हा सदस्य आणि कार्यकारणी पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.भंडारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष श्री.हेमंत करंगुटकर,पदाधिकारी श्री.रमण वायंगणकर ,सरचिटणीस श्री.हेमंत सावंत ,कुडाळ तालुका अध्यक्ष श्री.गजानन वेंगुर्लेकर,श्री.श्रीकांत वेंगुर्लेकर,मालवण तालुका अध्यक्ष श्री.रविंद्र तळशीलकर,सावंतवाडी तालुका अध्यक्ष श्री.प्रसाद अरविंदेकर ,श्री.विकास वैद्य,जिल्हा प्रसिद्धी प्रमुख श्री.समिल जळवी,श्री.राजु गवंडे ,श्री. सुनिल नाईक ,श्री.भरत आवळे ,श्री.प्रियदर्शन कुडव ,श्री.नामदेव साटेललकर ,श्री.मनोहर पालयेकर ,श्री.लक्ष्मीकांत मुंडये अन्य भंडारी महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page