⚡कुडाळ ता ०६-: ग्रामीण भागातील सर्वसामान्य व्यक्तीना कायदयाची ओळख व माहिती मिळावी या उद्देशाने आणि ना. उच्च न्यायालय विधी सेवा प्राधिकरण मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकारण सिंधुदुर्ग ओरोस यांचे निर्देशानूसार दिवाणी न्यायालय, (क. स्तर) कुडाळ, व कुडाळ तालुका वकील संघटना यांचे वतीने आज सकाळी १०.३० वाजता मोबाईल व्हॅन शिबीर ग्रामपंचायत कार्यालय, तेर्सेबांबर्डे येथे संपन्न झाले.
या शिबीरामध्ये अॅड. राजीव बिले यांनी अन्न आणि शिक्षणाचा अधिकार, याविषयांवर व अॅड. कविता खोचरे यांनी माहिती अधिकार कायदा २००५ या विषयांवर, ऍड. संजय रानडे यांनी पालकांची देखभाल आणि कल्याण आणि जेष्ठ नागरिक कायदा या विषयावर व अॅड निलांगी रांगणेकर/सांवत यांनी पॉस्को (POCSO) कायदा या विषयावर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला तेर्से बांबर्डे सरपंच रामचंद्र परब, उपसरपंच रोहिणी हळदणकर, ग्रामपंचायत अधिकारी भूषण बालम, पोलीस पाटील रमाकांत जाधव, तेर्सेबांबर्डे जि.प.शाळा मुख्याध्यापीका श्रीमती कवीता पालव, विदयार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.
तेर्सेबांबर्डे येथे मोबाईल वॅन कायदेविषयक मार्गदर्शन…
