निमंत्रित नृत्यांगनांच्या नृत्याने साईभक्त मंत्रमुग्ध…

पिंगुळी येथील साई मंदिरचा ३५ वा वर्धापन दिन..

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामांकित निमंत्रित नृत्यांगनांच्या विविधांगी नृत्याविष्काराने श्री साईभक्त मंत्रमुग्ध झाले. निमंत्रितसह जिल्ह्यातील 70 नृत्य कलावंतांनी कलाविष्कार सादर केला.
      श्री साईसेवा प्रतिष्ठान,मुंबई आणि साईभक्त यांच्या वतीने श्री साई मंदिराच्या ३५व्या वर्धापन दिन सोहळ्याला 31 जानेवारीपासून भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली. मंगळवारी रात्री श्री साई सेवा प्रतिष्ठान मुंबई व साईभक्त  यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही जिल्ह्यांतील नृत्य कलाकारांच्या कलागुणांना वाव देण्याच्या उद्देशाने नृत्याविष्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या नृत्याविष्कार कार्यक्रमात जिल्ह्यातील नामांकित नृत्य  नर्तक नर्तिका सह नवोदित नृत्य कलाकार सुद्धा सहभागी झाले होते. मंडळाच्या वतीने त्यांना श्री साईंची प्रतिमा व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. क्लासिकल, सेमी क्लासिकल, वेस्टर्न, गोंधळ, नाट्यगीत ,लावणी, कोळी नृत्य, असे विविध नृत्याविष्कार करत सर्व कलावंतांनी रसिकांची मने जिंकली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने सिद्धी दळवी  हिला वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यात आल्या. सर्व कलावंतांचे त्यांच्या कलागुणांचे कौतुक करण्यात आले.
यावेळी श्री साई प्रतिष्ठान मुंबईचे अशोक सूर्यवंशी, सुहास पारकर, शिवाजी अडसुळे, भाऊ मांजरेकर, वैष्णवी आडसुळे, गणेश कांदेकर, मिलिंद पारकर, सामाजिक कार्यकर्ते व्हीं आर सावंत, विनोद शिरवंडकर, योगेश आसोलकर, दिव्येश शिरवंडकर, गणेश जाधव, सिद्धेश आडसुळे, भाग्यश्री पारकर, आराध्य पारकर, योगेश आडसुळे, विजय दळवी, सौ दळवी, साई दळवी आणि साईभक्त आदी उपस्थित होते.
 श्री साई मंदिराच्या 35 व्या वर्धापन दिनानिमित्त 31 जानेवारी ते 4 फेब्रुवारी या कालावधीत विविध सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रमाचे भरगच्च आयोजन करण्यात आले होते.

You cannot copy content of this page