कुडाळ : ग्रामीण भागातील सर्वसामान्य व्यक्तीना कायदयाची ओळख व माहिती मिळावी या उद्देशाने आणि ना. उच्च न्यायालय विधी सेवा प्राधिकरण मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकारण सिंधुदुर्ग ओरोस यांचे निर्देशानूसार दिवाणी न्यायालय, (क. स्तर) कुडाळ, व कुडाळ तालुका वकील संघटना यांचे वतीने दि.५ ते ७ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत कुडाळ तालुक्यात जनजागृतीपर कायदेविषयक मार्गदर्शन शिबीराचे व मोबाईल व्हॅन लोकअदालतीचे आयोजन केले आहे. या कार्यकमाचे उदघाटन दिवाणी न्यायालय, कुडाळ येथे आज सकाळी जी.ए. कुलकर्णी, दिवाणी न्यायाधीश क. स्तर कुडाळ यांचे हस्ते झाले. सदरहू कार्यक्रमाला सह दिवाणी न्यायाधीश क स्तर पी. आर. ढोरे, कुडाळ तहसिलदार विरसिंग वसावे, संजय ओरोसकर, विस्तार अधिकारी, प.स. कुडाळ, श्रीमती मृणाल कार्लेकर, सहा. प्रशासन अधिकारी प.स. कुडाळ, कुडाळ वकील संघटना अध्यक्ष अॅड सुरेंद्र मळगांवकर तसेच अँड सुहास सावंत, अॅड अमोल सामंत, अॅड समीर कुलकर्णी, अॅड गौरी देसाई अॅड कविता खोचरे, अॅड रुपाली कदम, सौ.दिपा परुळेकर, सहा अधिक्षक दिवाणी न्यायालय, कुडाळ व इतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
जी.ए. कुलकर्णी दिवाणी न्यायाधीश क. स्तर कुडाळ यांनी मोबाईल व्हॅन पुजन करुन हिरवा झेंडा दाखवून मोबाईल व्हॅन झाराप येथे शिबीरासाठी मार्गस्थ केली.
कुडाळ येथे मोबाईल कायदेविषयक मार्गदर्शन शिबिरांचे उद्घाटन…
