संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळ येथे राष्ट्रीय चर्चासत्र संपन्न…

देशभरातून १२५ संशोधक लेखांचा सहभाग:हिमाचल प्रदेश ते पॉंडेचेरीचे संशोधक सहभागी..

कुडाळ : संत राऊळ महाराज महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभाग, इंग्रजी विभाग, आणि ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने आणि आयसीएसएसआर (ICSSR) मुंबई प्रायोजित एक दिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. “सामाजिक शास्त्रे इंग्रजी साहित्य आणि ग्रंथालय यामधील नवे प्रवाह” असा या चर्चासत्राचा विषय होता. हिमाचल प्रदेश पासून ते पांडेचरीपर्यंत संशोधकांनी या चर्चासत्रामध्ये सहभाग नोंदवला. या चर्चासत्रासाठी 125 संशोधक लेख आले होते.
कराची महाराष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष का. आ. सामंत यांच्या उपस्थितीत या चर्चासत्राचे उदघाटन झाले. सामंत सरांनी ते जेव्हा विद्यार्थी दशेत होते तेव्हापासून कसे बदलत गेले आणि आत्ताच्या घडीला कुठले नवे प्रवाह शिक्षण क्षेत्रात आलेले आहेत याविषयी भाष्य केले. या चर्चा सत्रासाठी बिज भाष्य करण्यासाठी लांजा येथील अर्थशास्त्राचे प्राध्यापक. के आर चव्हाण हे उपस्थित होते. त्यांनी आपल्या व्याख्यानामध्ये सामाजिक शास्त्रातील आणि विशेषतः अर्थशास्त्रातील नव्या प्रवाह बद्दल सखोल असे मार्गदर्शन केले.
इंग्रजी विषयातील तज्ञ म्हणून डॉ. दत्तगुरु जोशी प्राध्यापक गोगटे वाळके कॉलेज, बांदा हे उपस्थित होते. त्यांनी इंग्रजी भाषेतील सध्याचे नवे प्रवाह आपल्या मार्गदर्शनातून संशोधकांना सांगितले. ग्रंथालयासाठी डॉ. हिंदुराव वायदंडे हे ऑनलाइन मार्गदर्शन करण्यासाठी उपलब्ध होते. त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि ग्रंथालय यावर आपल्या व्याख्यानामध्ये प्रकाश टाकला. या चर्चासत्रासाठी दोन्ही प्रकारे (ऑनलाइन व ऑफलाइन) संशोधकांनी आपले संशोधन लेख सादर केले‌.
महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. स्मिता सुरवसे यांच्या अध्यक्षतेखाली हे चर्चासत्र संपन्न झाले. त्यांनी तिन्ही विषयातील बदलत्या नव्या प्रवाह संदर्भात माहिती मार्गदर्शन केले. या चर्चा सत्रासाठी डॉ. भारत तुपेरे, डॉ. साईनाथ लोखंडे, आणि डॉ. दीपक चव्हाण यांनी अथक मेहनत घेऊन हे चर्चासत्र यशस्वी केले.पाहुण्यांचा परिचय कार्यक्रमात डॉ. कॅ. एस‌ टी आवटे यांनी करून दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. भारत तुपेरे यांनी केले. सूत्रसंचालन प्राध्यापिका शिरोडकर मॅडम, प्राध्यापिका राजगुरू मॅडम, डॉ. आर वाय ठाकूर यांनी केले तर चर्चासत्रातील विविध सेशन मध्ये आभार प्रदर्शन प्राध्यापिका गावडे मॅडम, आणि डॉ. भारत तुपेरे यांनी केले. या कार्यक्रमासाठी संशोधक, प्राध्यापक, आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या चर्चासत्रा साठी शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली.

You cannot copy content of this page