वैभववाडीत माघी गणेश जयंती उत्सवा निमित्त रक्तदान शिबीर संपन्न…!

⚡वैभववाडी ता.०१-: श्री गणेश उत्सव कला क्रीडा मंडळ, गणेश नगर व सिंधु रक्त मित्र प्रतिष्ठान वैभववाडी माघी गणेश जयंती उत्सवा निमित्त रक्तदान शिबीर संपन्न झाले
या रक्तदान शिबीरात एकुण ३२ रक्तदात्यांनी सहभाग घेऊन २८ रक्तदात्यांनी रक्तदान केले ५ रक्तदात्यांचे वैयक्तिक वैद्यकीय कारणांस्तव रक्तदान होऊ शकले नाही *रक्तदान शिबीराचे उद्घाटन सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनिल अवसरमोल यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी वेळी श्री गणेश उत्सव कला क्रीडा मंडळ चे अध्यक्ष श्री.गणेश मोहिते, मंगेश चव्हाण मारुती मोहिते उत्तम चव्हाण संतोष पवार आदी मंडळांचे कार्यकर्ते उपस्थित होते तसेच सिंधु रक्त मित्र प्रतिष्ठान वैभववाडी अध्यक्ष श्री राजेश पडवळ तसेच जीवन धारा ब्लड बँक कोल्हापूर यांच्या सहकार्याने हे रक्तदान शिबीर संपन्न झाले.
अकरावी वर्धापन दिनानिमित्त गणेश पूजा सत्यनारायणाची महापूजा हळदीकुंकू असे अनेक कार्यक्रम मंडळाच्या वतीने आज दिवसभर साजरे करण्यात आले यावेळी मंडळाचे अध्यक्ष गणेश मोहिते अक्षय मोहते मंगेश चव्हाण रमेश चव्हाण संतोष पवार उत्तम चव्हाण मारुती मोहिते रंगराव चव्हाण आधी मंडळाचे कार्यकर्ते जेष्ठ मंडळी उपस्थित होते

You cannot copy content of this page