आचरा पारवाडी येथील कोळबी प्रकल्पा विरोधात नागरिक एकवटले..

दहा दिवसांत कारवाई करा,अन्यथा तीव्र आंदोलन:पारवाडी, डोंगरेवाडीतील ग्रामस्थाचा इशारा

मालवण दि प्रतिनिधी आचरा पारवाडी हद्दीत सुरू असलेल्या कोळंबी प्रकल्पामुळे आचरा पारवाडी, डोंगरेवाडी भागातील शेत जमीन नापीक बनत चालली असून विहिरीचे पाणीही दुषित होत असल्याने हा प्रकल्प बंद करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्याकडे करूनही प्रशासनाकडून आजपर्यंत प्रकल्प बंदबाबत कोणताही कार्यवाही न झाल्याने आचरा पारवाडी, डोंगरेवाडी ग्रामस्थांनी येत्या दहा दिवसांत प्रकल्पांबाबत ठोस निर्णय न झाल्यास तीव्र जनआंदोलन उभारण्याचा इशारा एका निवेदनाद्वारे ग्रामस्थांनी दिला आहे. आचरे पारवाडी हद्दीत चालू असलेल्या कोळंबी प्रकल्पामुळे पारवाडी, डोंगरेवाडीतील शेतकऱ्यांच्या शेकडो एकर शेतजमिनीत खारे पाणी शिरून शेतजमिनी व वाडीतली पिण्याच्या पाण्याच्या विहिरी दुषित झाल्या आहेत. त्यानंतर ग्रामस्थांनी ग्रामसभेत आवाज उठवत प्रकल्प बंद करण्याचा एकमुखी ठराव घेतला होता. त्यानंतर आमदार वैभव नाईक यांनी ग्रामस्थांची भेट घेत प्रकल्प बंद करण्यासाठी जिल्हाधिकारी यांचे लक्ष वेधण्याचे आश्वासन दिले होते आमदार वैभव नाईक यांनी आचरा सरपंच प्रणया टेमकर व ग्रामस्थ यांच्यासमवेत तिल्हाधिकारी यांची ८ एप्रिलला भेट घेतली होती या निवेदनात म्हटले आहे कि, आमदार वैभव नाईक यांच्यासमवेत आमच्या शिष्टमंडळाने आपली भेट घेतली होती. आपणाकडून आम्हा ग्रामस्थांना आठ दिवसात पाहणी करून प्रकल्पाच्या परीणामाची माहिती घेवू असे आश्वस्थ केले होते मात्र आजपर्यंत या प्रकल्प संदर्भात कोणतीही पाहणी झालेली नाही. दिवसागणीक आचरा पारवाडी डोंगरेवाडीतील पिण्याचे पाणी दुषित होत असून समस्या गंभीर होत चालली आहे. सदर कोळंबी प्रकल्पात पाणी साठावणे चालूच आहे. पावसाळयाचा हंगाम काही दिवसावर असून प्रकल्प बंद न झाल्यास गतवर्षी प्रमाणे पारवाडीला पुराचा सामना करावा लागणार आहे. आपले लक्ष वेधूनही हा प्रकल्प बंद व्हावा यासाठी कोणतेही ठोस पाहूल उचलले गेलेले दिसत नाही. आमच्या या निवेदनाचा आपण साहनभुतीपुर्वक विचार करून येत्या १० दिवसात योग्य तो निर्णय घेवून प्रकल्प बंद करण्याची कार्यवाही करावी. अन्यथा आम्ही ग्रामस्थ आमची घरेदारे, शेती वाचवण्यासाठी न्याय सनदशीर मार्गाने जनआंदोलन छेडणार असल्याचा इशारा निवेदनाव्दारे ग्रामस्थांनी दिला आहे

You cannot copy content of this page